अखेर सापडलाच 'हा' मास्टर माईंड....

Robbery Mastermind Closet In Savantwadi Kokan Marathi News
Robbery Mastermind Closet In Savantwadi Kokan Marathi News

सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : येथील शहरात व माजगाव आणि चराठे येथे पाच दिवसांपूर्वी भरदिवसा ढवळ्या घरफोडी करून अज्ञात चोरट्याने साडेनऊ लाखांचा मुद्देमाल चोरिस नेला होता. या चोरी प्रकरणातील चोरट्यांना पकडणे सिंधुदुर्ग पोलिसांसमोर आव्हान होते. हे आव्हान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी स्वीकारत अवघ्या सहा दिवसांतच या चोऱ्या मागील मास्टर माईंडला ताब्यात घेतले.

प्रकाश पाटील (वय ४०, रा. बेळगाव, कर्नाटक) असे त्याचे नाव असून सिंधुदुर्गात झालेल्या घरफोड्यांची त्याने कबुली दिली आहे. त्याला बुधवारी दोडामार्गमधून ताब्यात घेतले असून सुरवातीला बेकायदा बंदूक बाळगल्याप्रकरणी अटक करून दोडामार्ग येथील न्यायालयात हजर केले असता २ फेब्रुवारीपर्यंत चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

येथील शहरातील खासकीलवाडा येथील बंगला, माजगाव महालक्ष्मी अपार्टमेंट मधील फ्लॅट तसेच चराठा येथील बंद घरात मिळून एकूण तीन ठिकाणी घरफोडी केल्याप्रकरणी पाटील यांच्या मुसक्‍या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. संशयित पाटील हा घरफोड्यामधील सऱ्हाईत गुन्हेगार असून त्याच्याकडे भारतीय स्वदेशी बनावटीची कट्टा पिस्टल तसेच चार राऊंड गोळ्या देखील सापडल्या आहेत.

पाच लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरला

खासकीलवाडा येथील सिमीत्री जवळ असलेला भरत गवस यांच्या पत्नी बाजारात गेल्याची संधी साधून चोरट्याने बंगला फोडून आतील रोख रकमेसहीत सोन्या चांदीचे दागिने मिळून पाच लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. तर शहराच्या बाजूलाच असलेल्या माजगाव गरड येथील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आनंद देसाई यांचा फ्लॅट फोडून जवळ रोख रक्कम, दागिने मिळून साडेतीन लाख रुपयांचा तसेच चाराठा येथील बंद घर फोडून दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

एकाच दिवशी तिन चोऱ्या

या तिन्ही चोऱ्या चोरट्याने एकाच दिवशी तासाभरात अंतरातील फरकाने आणि त्या ही दिवसा ढवळ्या शहरातील गजबजलेल्या ठिकाणी भर दिवसा केल्या होत्या. या चोरीच्या घटनांनी शहरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते सापडले नाही. एकंदरीतच या चोरीच्या घटनांन मागे सऱ्हाईत चोरी करणाऱ्या टोळी चा समावेश असल्याची शक्‍यता वर्तवली जात होती. याबाबत सावंतवाडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते तर दुसरीकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडे ही या चोरीचा तपास सोपवला होता. 

दोडामार्ग शहरात सापडला

दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस संशयितांच्या मागावर होते. दोडामार्ग शहरात संशयित फिरत असल्याची टीप मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याजवळ घरफोडीचे साहित्य सापडले. शिवाय त्याबेकायदा पिस्टल बाळगल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सावंतवाडीत २४ला झालेल्या तिन्ही घरफोडींची त्याने कबुली दिली आहे. त्याच्यासोबत अन्य साथीदार आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत.

सराईत गुन्हेगार; पन्नासहून अधिक गुन्हे
घरफोडीतील पकडलेला संशयित हा बेळगाव कर्नाटकातील असून तो सावंतवाडीत दुचाकीवरून बंद घराची टेहळणी करत होता. त्यानंतर व्यवस्थीत रेकी करून त्याने चोरीचा डाव साधला. हा सराईत चोरटा असून त्याच्यावर अत्तापर्यंत ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या अशाच गुन्ह्यांतही याच संशयितांचा हात असण्याची शक्‍यता आहे. त्या दिशेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com