धामणसेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

रत्नागिरी - तालुक्‍यातील धामणसे येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्यवस्थेत त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवले आहे; मात्र कारण उशिरापर्यंत समजू शकले नसल्याची माहिती रुग्णालयातील चौकीतील पोलिसांनी सांगितले. जितेंद्र दीपक गोणबरे (वय 19, रा. धामणसे) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. आज दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास माजघरात त्याने गळफास घेतला; मात्र घरातील लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर गळफासावरून उतरवून तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Dhamanaset youth tried to commit suicide