स्त्रियांनी 'धवला' साहित्यप्रकारातून मांडला 'उत्क्रांतिवादाचा' सिद्धांत

अमित गवळे 
सोमवार, 21 मे 2018

पाली- आगरी बोली भाषेच्या संवर्धनार्थ तिच्या प्रचार-प्रसार करण्याचा उद्देशाने चालू झालेल्या 'आगरी शाळा' या अभूतपुर्व उपक्रमाची सांगता रविवारी (ता २१) झाली. यावेळी तज्ज्ञांनी आगरी भाषेच्या प्राचिन काळापासून असलेल्या धवला या साहित्य प्रकारावर सखोल भाष्य केले. तसेच या साहित्य प्रकारातून महिलांनी प्राचीन काळी उत्क्रांतीवादाचा सिद्धांतच मांडला होता असे सांगितले.

पाली- आगरी बोली भाषेच्या संवर्धनार्थ तिच्या प्रचार-प्रसार करण्याचा उद्देशाने चालू झालेल्या 'आगरी शाळा' या अभूतपुर्व उपक्रमाची सांगता रविवारी (ता २१) झाली. यावेळी तज्ज्ञांनी आगरी भाषेच्या प्राचिन काळापासून असलेल्या धवला या साहित्य प्रकारावर सखोल भाष्य केले. तसेच या साहित्य प्रकारातून महिलांनी प्राचीन काळी उत्क्रांतीवादाचा सिद्धांतच मांडला होता असे सांगितले.

शनिवारी (ता.१९) झालेल्या आगरी शालेच्या सत्रात उत्क्रांतिवाद म्हणजेच सजीवसृष्टी जन्माला कशी आली हे शास्त्रज्ञ डार्विन, अॅरिस्टॉटल वा इतरांच्या सिध्दांत मांडण्याआधी आगरी समाजातील स्त्रियांनी 'धवला' या साहित्यप्रकारात पुरातन काळापासून मांडला आहे हे दया नाईक यांनी सांगितले. तसेच 'जीवसृष्टी निर्मीतीचा' आगरी धवला सादर केला. त्यानंतर आगरी बोलीत माणसाच्या जन्मापासुन 'तिजोरा' ते मृत्यू पश्चात 'गाऊत्री' या विधी सांगत आगरी बोली किती समृध्द आहे हे सांगीतले.

रविवारी (ता.२०) आगरी शालेच्या दहाव्या सत्रात प्रविण पाटील आणि त्यांची मुलगी स्वरा यांनी 'पम्याची पोर, टवाल खोर' ही आगरी नाटिका सादर करून  प्रशिक्षणार्थींमध्ये हश्या पिकवला. त्यानंतर अॅड. शंकर भोईर यांनी रामायणाचे प्रसंग आगरी कोडी घालून ओळखण्याचा एक वेगळाच खेळ सादर केला. प्रकाश पाटील (पनवेल) यांनी त्यापुढे 'आगरी महाभारत' विनोदी शैलीत सादर करीत जूगार न खेळण्याचा संदेश दिला. यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना अल्ट्रा मराठी तर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या आगरी शालेत मार्गदर्शन करण्यासाठी मोरेश्वर पाटील, गजानन पाटील, प्रकाश पाटील, दया नाईक, सर्वेश तरे उपस्थित होते. त्यांचा सत्कार ठाणे मनविसेचे उपाध्यक्ष किरण पाटील यांनी केला. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की आगरी साहित्याला, भाषेला राजाश्रयाची नितांत गरज आहे. आगरी शाला या अभिनव उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी इतके आगरी समाजाचे लोकप्रतिनिधी असताना एकही लोकप्रतिनीधी आले नाही ही खंताची गोष्ट आहे. या आगरी शालेची सांगता करताना ‘इतक्या चांगल्या प्रतिसादानंतर आम्हाला आगरी शाला सुरू करण्याचे आमंत्रण ठिकठिकाणावरून आले असून आपण पुन्हा सुरू करू’ असे युवा साहित्यक सर्वेश तरे यांनी सांगितले.

उत्स्फुर्त आणि भरघोष प्रतिसाद
बोली भाषा संवर्धनार्थ ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात चालू असलेल्या या आगरी शालेत एकूण दहा सत्र झाले. यामध्ये ५० हून अधिक प्रशिक्षणार्थींनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. विशेष बाब म्हणजे या प्रशिक्षणार्थींमध्ये पोलिस, अधिकारी, डॉक्टर, अभियंता,  वकिल वसमाजसेवक अश्या उच्चशिक्षीतांपासून सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. सहभागी प्रशिक्षणार्थी पुणे, पेण, अलिबाग, उरण, नवी मुंबंई, पनवेल, मुंबई अशा विवीध ठिकठिकाणांवरून आले होते. त्यात आगरी-बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही समावेश होता.

आगरी पौरोहित्य
आगरी समाजाला पौरोहित्य करण्यासाठी संस्कृत, पुरोहित वा इतर तिसर्या व्यक्तींची गरज न लागता ते करण्यासाठी आगरी बोलीत पौराहित्याचं काम ‘धवलारीनी’ आणि ‘भगत’ पुरातन काळापासून करीत असल्याचे सर्वेश तरे यांनी नमूद केले.

Web Title: dhawla literature bu aagri woman