सावधान ! तर डॉक्‍टरांवर होणार आता कारवाई .. का ते वाचा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dialysis center  Inauguration in Kankavali kokan marathi news

रिक्त पदांची सबब नको ..पालकमंत्री उदय सामंत : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवेचे उद्‌घाटन... 

सावधान ! तर डॉक्‍टरांवर होणार आता कारवाई .. का ते वाचा..

कणकवली (रत्नागिरी) :  डॉक्‍टरांच्या रिक्‍तपदांची समस्या संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे रिक्‍तपदांची सबब सांगू नका. रुग्णांना चांगली सेवा द्या असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवेचे उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

येथील उपजिल्हा रुग्णालयात मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे किडनी डायलिसिस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचे उद्‌घाटन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले. या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले आदी उपस्थित होते. 

हेही वाचा- 295 वर्षांच्या किल्ल्याला मिळणार नवी उभारी...

आयसीयू युनिट सुरू झालेच पाहिजे
श्री. सामंत यांनी प्रथम रूग्णालयीन सेवेचा आढावा घेतला. रुग्णालयातील रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी आणि सेवांबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ.सहदेव पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टरांची कमतरता, आयसीयू युनिटसाठी स्वतंत्र स्टाफ नसणे आदी समस्या डॉ.पाटील यांनी मांडल्या. तसेच स्वतंत्र स्टाफ नसल्याने आयसीयू युनिट सुरू करता येणार नसल्याचेही सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी कारणे सांगू नका. आयसीयू युनिट सुरू झालेच पाहिजे. तसेच डॉक्‍टरांची कमतरता संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे जे उपलब्ध डॉक्‍टर आहेत, त्यांनी रुग्णांना चांगली सेवा द्यायलाच हवी. विनाकारण येथील रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवू नका असेही सामंत म्हणाले.

हेही वाचा-  या रेल्वे प्रकल्पाला का मिळेना गती..?

दीडशे रुपयांत डायलिसिस सेवा 
शासकीय रुग्णालयात 300 रूपयांमध्ये डायलिसिस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातही डायलिसिस रुग्णांकडून तीनशे रुपयांची आकारणी होते. मात्र कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दीडशे रुपयांत डायलिसिस होणार आहे. त्याबाबतचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्याचे पालकमंत्री सामंत म्हणाले. 

हेही वाचा- तिला द्यायचा होता कुटुंबाला आधार ; मात्र अखेर तिला मृत्यूने गाठले

"त्या' डॉक्‍टरांवर कारवाई व्हावी! 
अनेक डॉक्‍टर सरकारी रुग्णालयांत रुजू होतात. सरकारी सेवेबरोबरच खासगी प्रॅक्‍टिसही जोरात करतात. तेथे जम बसल्यानंतर सरकारी सेवेचा राजीनामा देतात. त्यामुळे रुग्णांना चांगले डॉक्‍टर्स मिळत नाहीत. या स्थितीत बदल होण्यासाठी कठोर कायदा करण्याबाबत आपण आग्रही आहोत. जे डॉक्‍टर्स अर्धवट सेवा सोडतील त्यांचा डॉक्‍टर परवानाच रद्द करण्याबाबतची कारवाई व्हायला हवी, असे पालकमंत्री सामंत म्हणाले.  

Web Title: Dialysis Center Inauguration Kankavali Kokan Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..