पंचावन्न अपंगांनी केला रायगड सर

mahad
mahad

महाड - ''हौसलो की उडान है'', याचा प्रत्यय शिवरायाच्या पराक्रमाची साक्ष असलेला रायगड व गडावरील प्रत्येक वास्तुची अनुभुती घेण्यासाठी आलेल्या अपंगांनी दिला. रायगड चढतांना जी थे धडधाकट ही दमतात तेथे अपंगांनी आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर रायगडाची चढाई केली. रायगड किल्ला पायऱ्यांनी झपाझप चढून त्याची भ्रमंती करण्याचे साहस मुंबईतील पंचावन्न अपंगांनी काल करून दाखवले. जूहूच्या रोटरी क्लब आणि फिनीक्स फाऊंडेशनने या सर्वांना जागतिक अपंग दिनानिमित्त हि अनोखी भेट दिली. अपंगांचे हे साहस भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारे ठरले.

फिनिक्स फाऊंडेशन या संस्थेने एक डिसेंबरला या सर्वांना  रायगड स्वारी करण्यास आणले. चढाईकरेपर्यंत होणाऱ्या काळोखाची तमा न बाळगता अपंगानी सायंकाळी 4 वाजता रायगड किल्ला नाणेदरवाजापासून चढायला सुरूवात केली.  कोणी कुबड्या घेऊन तर कुणी दोन्ही हातात काठ्या घेऊन असे स्व रायगड चढत होते. सशक्त माणसाला गड चढणे अवघड तिथे या अपंगांची हिम्मत पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. फिनिक्स फाऊंडेशनचे मदतनीस या सर्वांना सांभाळून नेत होते रविवार संपूर्ण दिवस या अपंगांनी इतिहास अभ्यासक संजय तळेकर यांच्या सोबत गडभ्रमंतीत घालवला. 

पायात सळई बसविलेल्या विनोद रावत यांनी तर जय शिवाजी जय भवानी अशी आरोळी ठोकत गड चढला. रायगड सर करताना कोणताही त्रास झाला नसून उत्साहाला उधाण आल्याची कबूली दिली तर छत्रपतींचा हे विश्व पाहताना मावळा झाल्या सारखे वाटते असे सांगितले. सुलतान सय्यद, ऋतुजा बुचा यांचा उत्साह तितकाच होता. आयोजक दिनेश पाटील व फाऊंडेशनचे संस्थापक संतोष संसारे यांनी हा उपक्रमाद्वारे दरवर्षी वेगवेगळे गड, शिखर अपंगाना दाखवतात .त्यांचा आनंद हेच संस्थेचे यश असते हे त्यांनी आवर्जून सांगितले.

गेली अठरा वर्षे फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने सह्यांद्रीच्या पर्वतरांगांतील साहसी भ्रमंतीत अपंगांना सहभागी केले जाते. कळसूबाई सारखे उंच शिखर, अनेक सुळके, लोहगडासारखे अवघड किल्ले यापूर्वी त्यांनी सर केले आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी सहभागी अपंगांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com