चांदा-बांदा' बंद पडू देणार नाही : विनायक राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Distribution of awards of Taluka Journalist Committee kokan marathi news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 17 व 18 तारखेला राज्याची मिनी कॅबिनेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे.

चांदा-बांदा' बंद पडू देणार नाही : विनायक राऊत

सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : चांदा ते बांदा योजना कदापीही बंद पडू देणार नाही. त्यातून जाहीर झालेल्या योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहतील, असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी आज येथे व्यक्त केला.

 तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पत्रकारांचे विविध प्रश्‍न सोडविण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत व श्री. राऊत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. सामंत म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 17 व 18 तारखेला राज्याची मिनी कॅबिनेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. यात राज्याच्या सर्वच विभागांचे सचिव प्रत्यक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडले जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील जनतेला नक्कीच होईल.'' ते पुढे म्हणाले, "दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी या जिल्ह्याला मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा अवघ्या देशाने नव्हे तर जगाने स्वीकारला आहे.

हेही वाचा- चिपळूणच्या वेदवती केतकर संगीत नाट्य रंगभूमीवर

त्यामुळे त्यांच्या स्मृती कायम टिकाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील. सावंतवाडी पत्रकार संघातर्फे दिलेल्या पुरस्काराचे कौतुक करावे तितके थोडे आहे. याचा फायदा नवोदित तसेच ज्येष्ठ पत्रकारांना होईल.'' खासदार विनायक राऊत, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, हरिश्‍चंद्र पवार, संतोष सावंत, नागेश पाटील, भूषण आरोसकर आदी उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई यांनी प्रास्ताविक तर राजेश मोंडकर यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा - आयलॉग जेटीचे समर्थन स्वार्थासाठी असल्याचा आरोप

पत्रकार अरविंद शिरसाट, अभिमन्यू लोंढे, काका भिसे, शुभम धुरी, अर्जुन राणे यांच्यासह श्री. केसरकर यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी सचिव अमोल टेंबकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, रुपेश राऊळ, बाबू कुडतरकर, ऍड शामराव सावंत, पत्रकार शिवप्रसाद देसाई, सीए लक्ष्मण नाईक, मयुर चराठकर, रवी गावडे, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, कौस्तुभ पेडणेकर, मायकल डिसोजा, शिवसेना तालुका संघटक अपर्णा कोठावळे, रश्‍मी माळवदे, नगरसेविका भारती मोरे, प्रमोद म्हाडगुत, अण्णा केसरकर, भक्ती पावसकर, निखिल माळकर, योगिता बेळगावकर आदी उपस्थित होते.  
 

टॅग्स :Sindhudurg