उज्ज्वला योजनेच्या गॅस कनेक्शनचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

'ग्राम स्वराज' मोहिमेच्या अंतर्गत शुक्रवारी (ता. 20) वासांबे मोहोपाडा येथील श्री साईबाबा मंदिराच्या सभागृहात भारत गॅस केंद्र रसायनी यांच्या वतीने उज्ज्वल दिनानिमित्त लाभार्थी महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. 

रसायनी(रायगड) - 'ग्राम स्वराज' मोहिमेच्या अंतर्गत शुक्रवारी (ता. 20) वासांबे मोहोपाडा येथील श्री साईबाबा मंदिराच्या सभागृहात भारत गॅस केंद्र रसायनी यांच्या वतीने उज्ज्वल दिनानिमित्त लाभार्थी महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. 

रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापति ऊमाताई मुंढे, मोहोपाड्याचे सरपंच कृष्णा पारंगे, माजी सरपंच संदीप मुंढे, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला दळवी, डॉ. प्रतिभा महेन्द्रकर, उरण येथील भारत पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी  श्री जगन्नाथ, वितरण विभागाचे नितिन ठाकुर आदी यावेळी उपस्थित होते. 

उपस्थितांच्या हस्ते परीसरातील 17 लाभार्थी महिलांना उज्ज्वल योजनाच्या गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. तसेच, इतर महिलांनी उज्ज्वल योजनेचे नवीन गँस कनेक्शन मिळावे म्हणुन यावेळी नोंदणी केली आहे. 

गॅसमुळे महिलांची चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या त्रासातुन मुकत्ता होणार आहे, असे यावेळी डॉ. प्रतिभा महेंद्रकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी निश्चित कमी होतील, सर्वांना गॅसवर स्वयंपाक बनिण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन शितल गोंधळी यांनी केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Distribution of gas connection of Ujjwala scheme