पालीत जिल्हास्तरीय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेेला प्रारंभ

अमित गवळे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पाली (रायगड) : येथील राममंदिरात शनिवारी (ता.११) रात्री जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांचे उद्घाटन करण्यात अाले. तर रविवारी (ता.12) बुद्धिबळ स्पर्धा सुरु झाल्या, अनुपम कुलकर्णी मित्र मंडळाचे संस्थापक व शिवसेनेचे नेते अनुपम कुलकर्णी यांच्या वाढदिवसा निमित्त या स्पर्धांचे दरवर्षी अायोजन करण्यात येते.

कॅरम स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, राष्ट्रीय काँग्रेस सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुध्द (बाबा) कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हास्तरीय कँरम (डबल) स्पर्धेत जिल्हातील ८८ कॅरमपटूंनी सहभाग घेतला अाहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना चुरशीच्या लढती पाहण्यास मिळाल्या आहेत. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते कँरमपटू नथुराम पाटील रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, जुनिअर नँशनल प्लेअर निधीश भोसले, देवेन सिनकर, शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी, राजयोगीचे मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश शिंदे, अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे अध्यक्ष संदेश सोनकर, महेश खंडागळे, शिवसेना पाली शहरप्रमुख प्रमोद खोडागळे, चंद्रकांत घायले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: District Level Carom and Chess Championship competition started in PALI