esakal | जिल्हास्तरीय पारंपरिक आरत्यांची स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

जिल्हास्तरीय पारंपरिक आरत्यांची स्पर्धा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: सकाळ माध्यम समूह व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय पारंपरिक आरत्या सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. याद्वारे अत्यंत रसाळ, प्रासादिक आरत्या सादर करणाऱ्या भक्तजनांना व्यक्तीशा, तसेच सांघिक आरती सादरीकरण करून आपली कला पेश करण्याची संधी मिळणार आहे.

गणेशभक्तीचा एक उत्कट आविष्कार म्हणजे गणपतीतील आरत्या. मौखिक आणि लिखित परंपरेने चालत आलेल्या आरत्यांचे सादरीकरण दर दहा मैलावर बदलणाऱ्या भाषेप्रमाणे वैविध्यपूर्ण असते. नित्यनूतन आरत्यांची भर पडत असली, तरी जुन्या आरत्यांची गोडी वेगळीच आहे. अशा आरत्यांचे वैविध्य आणि त्याचा बाज टिकवून ठेवला असला तरी दिवसेंदिवस अशा पारंपरिक आरत्या आणि त्यांचे सादरीकरण मर्यादित झाले आहे. अशा आरत्या आणि त्यातील वैविध्य विस्मरणात जाऊ नयेत, म्हणून सकाळ माध्यम समूह व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल पारंपरिक, दुर्मिळ आरत्यांच्या सादरीकरणाची स्पर्धा आयोजित केली आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? चाकरमान्यांवर प्रशासनाची करडी नजर

स्पर्धकांनी कोणत्याही एका पारंपरिक आरती सादरीकरणाचा व्हिडिओ करावा, व्हिडिओ वैयक्तिक व सांघिक अशा कोणत्याही स्वरूपात चालेल, व्हिडिओच्या सुरवातीला स्वतःचे किंवा गटाचे नाव, पत्ता व व्हिडिओ केल्याची तारीख नमूद करावी, गणेशोत्सवात नेहमी म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांचा समावेश नको, व्हिडिओ व त्याचा ऑडिओ एडिट केलेला नसावा. व्हिडिओ शिरीष दामले ( ९४२३८७५४०२) आणि मंगेश मोरे (७७९८५४९००६) यांच्या व्हॉटस्अप नंबरवर पाठवावा.

सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र

प्रथम तीन क्रमांक, तसेच ७ उत्तेजनार्थ स्पर्धकांना रोख पारितोषिक दिले जाईल. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असून, स्पर्धा नियोजनात बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आले आहेत.

loading image
go to top