किरकोळ वादातून पत्नीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

दिवेआगर - दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून पत्नीची हत्या करून मृतदेह डोंगराळ भागातील झाडीत फेकल्याची घटना महिनाभरानंतर उघडकीस आली आहे. वंदना हिलम (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे.

दिवेआगर - दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून पत्नीची हत्या करून मृतदेह डोंगराळ भागातील झाडीत फेकल्याची घटना महिनाभरानंतर उघडकीस आली आहे. वंदना हिलम (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे.

बोर्लीपंचतनजवळ कार्ले आदिवासी वाडीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दिघी सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पती रमण हिलम (वय 42) याला अटक करण्यात आली आहे. तळा तालुक्‍यातील खांबोली गावातील हिलम दांपत्य मोलमजुरी करून गुजराण करत होते. रमण याला दारूचे व्यसन होते. सध्या ते दिवेआगर येथे काम करत होते. मृत महिलेचा भाऊ दीपक मोरे हा बरेच दिवस बहीण दिसत नसल्याने बहिणीविषयी रमण याच्याकडे विचारणा करत असे. तेव्हा तो, ती खेकडे विकायला गेली आहे किंवा गावी गेल्याचे सांगत असे. तीच ती उत्तरे ऐकून दीपकला संशय आल्याने त्याने खोदून खोदून विचारले असता रमण याने मारहाणीत दगडावर आपटून वंदना हिचा मृत्यू झाल्याची कबुली दिली.

Web Title: diveagar news wife murder