सर्दी, ताप, खोकला डोकेदुखी वाढलीय? Don't Worry: करा डॉक्टर ऑन कॉल!

 सर्दी, ताप, खोकला डोकेदुखी वाढलीय? Don't Worry: करा डॉक्टर ऑन कॉल!

रत्नागिरी : जिल्हयातही कोरोना (covid 19) रुग्णांची संख्या वाढत आहे व त्यामुळे डॉक्टर्स दवाखाने यांच्या वरील ताण वाढला आहे. याचा विचार करुन जिल्हा परिषदने अभिनव प्रयोग (Innovative experiments by Ratnagiri Zilla Parishad) सुरु केला आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या सर्व कोरोना रुग्णांसाठी टेलिफोनिक ओपीडी म्हणजेच डॉक्टर ऑन कॉल ही सुविधा सुरु केली आहे. या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसात 4 हजार 932 एवढ्या रुग्णांनी लाभ घेतला आहे.जिल्ह्यात पाच हजाराहून अधिक रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यातील गृह विलगीकीकरणात असलेल्यांची संख्या दोन हजार आहे.

Doctor on call Innovative experiments by Ratnagiri Zilla Parishad covid 19 update

होम आयसोलेशन मधील नागरीकांनी स्वत:ला व स्वत:च्या काळजीसाठी समर्थ करावे असा उद्देश ठेवून टेलिफोनिक ओपीडी म्हणजेच डॉक्टर ऑन कॉल ही योजना सुरु केली आहे. नागरीकांनी सर्दी, ताप, खोकला डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क होत नसल्यास किंवा कोरोनाबाबत काही शंका असल्यास तसेच आपली कोवीड टेस्ट पॉझिटीव्ह आली असेल तर तातडीने या टेलिफोनिक ओपीडीशी सपंर्क साधावा. या ठिकाणी एकूण पाच डॉक्टर व चार समुपदेशक तात्काळ सेवेसाठी उपलब्ध ठेवले आहेत. जिल्हयातील अनेक नागरीक जे याचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये हाम आयसोलेशन व्यतिरिक्त्‍ रुग्णांनाही उपचार दिले जातात.

होम आयसोलेशन मधील रुग्णांच्य काही तक्रारी असतील जसे की होम आयसोलेशन किट मिळाले की नाही किंवा इतर अनुषंगिक बाबी त्या विषयी वरिष्ठांशी चर्चा करुन तात्काळ कार्यवाही केली जाते. अनेक होम आयसोलेशन मध्ये असणा-या रुग्णांनी या ओपीडीचा पुरेपर फायदा घेऊन बरे झालेले आहेत. इतरही नागरीकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.

टेलिफोनिक ओपीडीचे असे चालते काम

डॉक्टर ऑन कॉल या टेलिफोनिक ओपीडीचे काम साधारणत: पुढील प्रमाणे चालते. सर्वप्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेमार्फत होम आयसोलेशन मध्ये असणा-या कोरोना रुग्णांची यादी प्राप्त होते. सर्व तालुक्यामधील या रुग्णांना कॉल केला जातो . यामध्ये लक्षणे उपचार आयसोलेशनचे दिवस या विषयी मार्गदर्शन केले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींना ट्रिटमेंटची आवश्यकता आहे अशा व्यक्तींना व्हॉट्सअपद्वारे उपचार दिला जातो. आहारा विषयी मार्गर्शन, सहा मिनिटे चालण्याविषयी सूचना, गृह विलगीकरणा विषयी नियमावली याचे मार्गदर्शन केले जाते. दर दोन ते तीन दिवसांनी सदर रुग्णांना फोन करुन फॉलोअप घेतला जातो. या टेलिफोनिक ओपीडीची खास बाब म्हणजे व्हिडीओ कॉल करुन सुध्दा उपचार सांगितले जातात.

होम आयसोलेशन रुग्णांसाठी दूरध्वनी क्रमांक - 02352 - 225403/ 226403 / 227403

होम आयसोलेशन रुग्णांसाठी मोबाईल क्रमांक - 8669187492 / 8668229856

वरील मोबाईल क्रमांकावर आपणांस Tele / Video / Email / Whatsapp Consultation करता येईल. वरील Help लाईनवर तज्ञ डॉक्टरची टिम तैनात आहे. तरी आपल्या शंका / समस्या यांचे निरसन करुन मार्गदर्शन केले जाईल हे निश्चित.

Doctor on call Innovative experiments by Ratnagiri Zilla Parishad covid 19 update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com