esakal | खळबळजनक! स्वॅब तपासणीची दोन यंत्रे बंदच, स्वॅबची तपासणी परजिल्ह्यातून
sakal

बोलून बातमी शोधा

खळबळजनक! स्वॅब तपासणीची दोन यंत्रे बंदच, स्वॅबची तपासणी परजिल्ह्यातून

खळबळजनक! स्वॅब तपासणीची दोन यंत्रे बंदच, स्वॅबची तपासणी परजिल्ह्यातून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक (corona positive) वाढत असताना स्वॅब (swab) तपासणीचे प्रमाण तीन हजारांवर गेले आहे. अशा स्थितीत शासकीय वैद्यकीय शिक्षण विभाग सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रयोगशाळेत दोन स्वॅब तपासणी मशिन तांत्रिक कारणामुळे बंद आहेत. परिणामी जवळपास दीड हजारांवर स्वॅब परजिल्ह्यातील प्रयोगशाळेतून तपासून घेण्याची वेळ आली आहे.

दोन महिन्यांपासून जिल्ह्यात (kolhaour district) बाधितांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची स्वॅब तपासणीला प्राधान्याने घेण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १०७ हून अधिक केंद्रांवरून दररोजचे जवळपास तीन हजारांवर स्वॅब संकलित होतात. असे स्वॅब तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत पाठवले जातात. तेथे एकूण चार मशिन आहेत. तेथे प्रत्येक सहा तासांमध्ये तीनशेहून अधिक चाचण्या होतात.

हेही वाचा: सावधान! कोव्हिड सेंटरमध्ये नातेवाईकांचा वावर ठरतोय घातक

त्यामुळे स्वॅबचे अहवाल दोन ते तीन दिवसांतच मिळतात. त्यासाठी प्रयोगशाळेचे वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पथके दिवस-रात्र कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी यातील दोन मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तपासणीचे काम जवळपास ठप्प झाले. जिल्ह्यातून स्वॅब संकलन सुरूच आहेत. त्यामुळे प्रयोगशाळेकडे येणाऱ्या स्वॅबची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. यातील एक ते दीड हजार स्वॅबची तपासणी होते. तेवढेच स्वॅब पुणे येथील दोन व रत्नागिरी येथील एका शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले जात आहेत. तेथेही स्थानिक स्वॅब तपासणीचे प्रमाण जास्त आहे.

परिणामी कोल्हापूरच्या स्वॅब तपासणी होण्यास विलंब होतो. परिणामी अहवाल मिळण्यास विलंब होतो. या सर्व तांत्रिक बिघाडाची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी प्रयोगशाळेला भेट दिली आणि तांत्रिक अडचणींचा आढावा घेतला.

तांत्रिक बिघाडातून बाधित संख्येत वाढ?

गेल्या महिन्याभरात दिवसागणिक दीड हजारांवर बाधित आढळत आहेत. गेल्या दहा दिवसांत मृतांचा आकडा पन्नासवर आहे. अशातच दोन मशिनमधून पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अचानक वाढले, तेव्हा प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांना मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्या मशिनची तंत्रज्ञ येथे येऊन तपासणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या व बाधितांची संख्या तांत्रिक बिघाडातून वाढू नये, याची खबरदारी म्हणून दोन मशिन बंद ठेवल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त झाली.

हेही वाचा: इंग्लंडचे मैदान गाजवण्यासाठी द्रविडचा कोहलीला मोलाचा सल्ला