दोडामार्गला पोटनिवडणुकांचा धुरळा

ग्रामपंचायतींच्‍या २४ रिक्त जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान;२२ ला मतमोजणी
election
electionsakal

दोडामार्ग : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या २४ रिक्त जागांसाठीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दाखल करावयाचे आहेत. अर्जांची छाननी ७ डिसेंबरला तर अर्ज मागे घेण्याची तारीख ९ आहे. मतदान २१ डिसेंबरला तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी २२ ला होणार आहे.

पोटनिवडणूक होत असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायती अशा ; (कंसात प्रभाग आणि प्रवर्ग) आंबडगाव-(प्रभाग १- प्रवर्ग- ना. मा. प्र. महिला) माटणे-( २- ना. मा. प्र.) (३- ना. मा. प्र. महिला, सर्वसाधारण महिला) वझरे गिरोडे- (१-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) खोक्रल (३-ना. मा. प्र. महिला) घोटगेवाडी-(१-अनुसूचित जाती महिला) कुंब्रल-(२-ना. मा. प्र. महिला) परमे पणतुर्ली -(२-ना. मा. प्र. महिला) मणेरी- (३-ना. मा. प्र. महिला) कोनाळ-(२- अनुसूचित जमाती महिला, अनुसूचित जाती महिला, ३- सर्वसाधारण) फुकेरी -(१-ना. मा. प्र. महिला, २-अनुसूचित जाती महिला, ना. मा. प्र.) मोरगाव-(२-ना. मा. प्र. महिला), कुडासे खुर्द-१-ना. मा. प्र., २-ना. मा. प्र. महिला) घोटगे-(१-ना. मा. प्र. महिला, ३- सर्वसाधारण प्रवर्ग) सासोली-१- सर्वसाधारण महिला) कोलझर ३-(ना. मा. प्र. महिला) मांगेली- (२-ना. मा. प्र.).

नामाप्रच्या तब्बल १६ जागा रिक्त

तालुक्यातील २४ रिक्त जागांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गाच्या तब्बल १६ जागा रिक्त आहेत. त्या १६ मधील १२ जागा महिलांसाठी आहेत. राजकारणात सक्रिय होण्यासाठीची उदासीनता पंचायत राज व्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये अडथळा ठरत आहे. सर्व प्रवर्गांना समान संधी देण्यासाठी राज्यघटनेत मुद्दामहून दुरुस्ती करण्यात आल्याने महिलांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com