Bombay Shieldtail Snake : महाराष्ट्राच्या जैवविविधतेत मोलाची भर! दोडामार्गमध्ये आढळला अत्यंत दुर्मीळ 'बॉम्बे शिल्डटेल' साप, सर्पमित्रांनी केले निरीक्षण

Rare Bombay Shieldtail Snake Spotted in Kudase : दोडामार्ग तालुक्यातील कुडासे येथे परसबागेत दुर्मीळ बॉम्बे शिल्डटेल साप आढळला. सर्पमित्रांनी निरीक्षण केले. या नोंदीमुळे सह्याद्रीच्या जैवविविधतेकडे पुन्हा लक्ष वेधले गेलेय.
rare Bombay Shieldtail snake spotted in Kudase

rare Bombay Shieldtail snake spotted in Kudase

esakal

Updated on: 

दोडामार्ग : तालुक्यातील कुडासे येथे एका परसबागेत अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या बॉम्बे शिल्डटेल (Bombay Shieldtail) या सापाचे दर्शन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा साप आल्यानंतर सर्पमित्र प्रकाश नाईक आणि सर्पमित्र सिद्धेश धारगळकर यांनी घटनास्थळी जाऊन त्याचे निरीक्षण केले. या दुर्मीळ सापाच्या नोंदीमुळे परिसरातील वन्यजीवप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com