दोडामार्गातील युवक-युवती गोव्यात मिळणार कामाची परवानगी....

dodamarg workers permission in goa state
dodamarg workers permission in goa state

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : गोवा सीमेवरील दोडामार्ग तालुक्यातील युवक युवतींना कामानिमित गोव्यात ये जा करण्याची परवानगी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तसे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांना दिले. त्यांनी डॉ. सावंत यांची आज भेट घेवून निवेदनही दिले.


  दोडामार्ग तालुक्यातील  अनेक युवक-युवती गोव्यात कामाला जातात. लॉकडाऊनमुळे त्यांचे काम बंद आहे. ते सध्या घरी आहेत. आता गोवा शासनाने त्यांना दोन हजार रुपये भरून त्यांची कोरोना चाचणी करुन कामावर घेण्यास तयारी दाखवली आहे; पण आयी, माटणे, आंबडगाव,वझरे, विर्डी, तळेखोल,सासोली, मणेरी ,दोडामार्गआदी ठिकाणाहून म्हावळीगे, डिचोली, होंडा,करासवाडा, लाडफे आदी ठिकाणीं कामाला जाणाऱ्या युवक युवतींना भाड्याने रूम घेवून राहण्याची गरज नाही. त्यांचे घर कामाच्या ठिकाणांपासून जवळ असल्याने त्यांना तसेच तालुक्यातील अन्य युवक युवतींना ये जा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी श्री धुरी यांनी केली.


याबाबत  येत्या दोन चार दिवसात त्यांच्याबाबत निर्णय घेण्याचे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्याचे श्री धुरी यांनी सांगितले.  यावेळी त्यांच्यासोबत युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस व बबलू पांगम उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com