दोडामार्गातील युवकांना `यासाठी` हवा गोव्यात प्रवेश

Dodamarg Youth Demand To Entry In Goa For Job Sindhudurg Marathi News
Dodamarg Youth Demand To Entry In Goa For Job Sindhudurg Marathi News

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - महाराष्ट्रातील गोवा सीमावर्ती भागातील नागरिकांना नोकरीसाठी गोव्यात प्रवेश मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान गवस यांच्यासह 250 युवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येथील तहसीलदार मोरेश्‍वर हाडके यांच्या माध्यमातून केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व दोडामार्ग तालुक्‍यातील गोवा सीमेलगत राहणाऱ्या नागरिकांना पूर्णपणे गोवा राज्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. कामधंदा, नोकरी, शिक्षण, बाजार, आरोग्याची सुविधा यासाठी आजपर्यंत संपूर्ण दोडामार्ग तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्यावरच अवलंबून आहे; पण 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन झाल्यामुळे गोवा राज्य व सिंधुदुर्ग जिल्हा यांनी सर्व सीमा सील केल्यामुळे गेले 50 दिवस गोव्यातील संपर्क तुटला आहे. त्यामुळे लोकांना संकटाशी सामना करावा लागत आहे. दोडामार्ग तालुक्‍यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 80 टक्के तरुण हे नोकरीसाठी गोव्यावरच अवलंबून आहेत.

गेल्या 50 दिवसांपासून कामधंदे बंद असल्यामुळे कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. तसेच अत्यावश्‍यक सेवा, गंभीर आजार, जखमी व्यक्ती, लहान मुलांचे आजार, गर्भवती माता अशा आरोग्य सेवा गोवा राज्याने बंद केल्या आहेत. यावर तातडीने तोडगा काढावा व आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान गवस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार मोरेश्वर हाडके यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत संतोष नाईक व अन्य उपस्थित होते. 

कामगारांची उपासमार थांबवा 
तालुक्‍यातील जवळ जवळ 250 तरुण हे दोडामार्ग तालुक्‍यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिचोली गोवा येथे एका कंपनीमध्ये रोजंदारी पद्धतीने काम करत आहेत; पण लॉकडाऊनमुळे कामावर जाणे शक्‍य नाही आणि गोवा राज्यात प्रवेश बंद केल्यामुळे कामापासून वंचित आहेत. व कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. संपूर्ण दोडामार्ग तालुक्‍यात गोव्यात काम करणारे बाराशेहून युवक बेकार झाल्याने त्यांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. त्यांची उपासमारी थांबवावी अशी मागणी श्री. गवस यांनी केली आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com