राणेंच्या भ्रमाचा भोपळा 21 तारखेला फुटणार ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

मुंबई -  राणे कुटुंब गोंधळलेल्या अवस्थेत आहे. एक भाऊ काय बोलतोय ते दुसऱ्याला पटत नाही. वडील तिसरेच काहीतरी बोलतात. त्यामुळे यांच्यावर जनतेने किती विश्‍वास ठेवावा, हा प्रश्‍नच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वाटेल तसे बोलतात. त्यांना वाटत असेल, की कोकणातील जनता त्यांना मते देईल, तर त्यांच्या भ्रमाचा भोपळा येणाऱ्या 21 तारखेला फुटेल, अशी टीका शिवसेना प्रवक्‍त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. 

उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी "यू टर्न' घेतले आहे; मात्र नीलेश राणे यांनी उद्धव यांच्यावर तोंडसुख घेणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे राणे आणि शिवसेना यांच्यातील "तू-तू, मैं-मैं' पुन्हा सुरू झाली आहे.

नीलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर कायंदे म्हणाल्या, की कोकणात राणे कुटुंबीयांची विश्‍वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेक ठिकाणी त्यांना हार पत्करावी लागली. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करणे हा एकच मुद्दा असतो. उद्धव ठाकरेंवर काहीही बोलले की कोकणातील जनता मत देते, हा राणे कुटुंबीयांचा गैरसमज आहे, असे कायंदे म्हणाल्या. 

भाजप आणि शिवसेनेची युती आहे. उद्धव ठाकरे यांना नावे ठेवण्यात राणे कुटुंबीयांचे कोणतेही बुद्धिचातुर्य दिसत नाही. एक भाऊ एक बोलतो; तर दुसरा काहीतरी वेगळेच बोलतो. नारायण राणेंची दोन्ही मुले वडिलांचे ऐकतात का, हाच मोठा प्रश्‍न आहे. 
- डॉ. मनीषा कायंदे,
प्रवक्‍त्या, शिवसेना  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DR Manisha Kayande comment on Rane Brothers