सह्याद्रीच्या पट्यात माकडतापाची भीती - डॉ. योगेश साळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

सावंतवाडी - माकडताप भविष्यात सह्याद्रीच्या पट्यात पसरण्याची भीती आहे. यावर प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी दरवर्षी तब्बल चाळीस लाख रुपयांचा खर्च आहे. त्यामुळे जिल्ह्यात तापाच्या साथरोगाचे संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आवश्‍यक असलेली जागा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी आज येथे दिली. 

सावंतवाडी - माकडताप भविष्यात सह्याद्रीच्या पट्यात पसरण्याची भीती आहे. यावर प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी दरवर्षी तब्बल चाळीस लाख रुपयांचा खर्च आहे. त्यामुळे जिल्ह्यात तापाच्या साथरोगाचे संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आवश्‍यक असलेली जागा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी आज येथे दिली. 

बांदा दोडामार्ग येथील साठ हजार लोकांना लसीकरण करण्यासाठी एक लाख ऐंशी हजार लस मागविण्यात आल्या आहेत. तीन टप्प्यात परीसरातील लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे, असे ही त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यध्या सौ. रेश्‍मा सावंत यांनी माकडतापाच्या पार्श्‍वभूमीवर येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. या वेळी साळे यांनी ही माहिती दिली. 

ते म्हणाले, ""बांदा येथे पसरलेली माकडतापाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र त्या पेक्षा ही त्या ठिकाणी बाधित क्षेत्रातील लोकांनी आपली सुरक्षा राखणे गरजेचे आहे. दोन दिवसापूर्वी बांदा येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण मोहिमेत उपस्थित शंभरहून अधिक महिलांनी अंगावर लावण्यासाठी देण्यात आलेले तेल लावलेच नसल्याचा प्रकार उघड झाला, ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकाने आपली आणि घरातील व्यक्तींची काळजी घेणे गरजेचे आहे.'' 

डॉ. साळे पुढे म्हणाले, ""माकडामार्फत याचा प्रसार सह्याद्रीच्या पट्यात होऊ शकतो. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने कायम स्वरूपी उपाय आवश्‍यक आहे. राज्यशासनाकडुन संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा झाली आहे; मात्र हे केंद्र जिल्ह्यातच होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली जागा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आवश्‍यक आहे. त्या ठिकाणी मॉरीक्‍युअर लॅबही अस्तित्वात आहे. फक्त नव्याने आवश्‍यक असलेले डॉक्‍टर तंत्रज्ञाची कायमस्वरुपी पदे भरणे आवश्‍यक आहे. अन्यथा भविष्यात प्रतिबंधात्मक लससाठी आपल्याला अन्य राज्यावर अललंबून राहावे लागणार आहे. सद्यस्थितीत मागविण्यात आलेल्या लससाठी कर्नाटक सरकारला आपल्या सरकारकडून तब्बल चाळीस लाख रुपये द्यावे लागणार आहे, साथ रोगाची परिस्थिती लक्षात घेता आणखी पाच वर्षे बाधित क्षेत्रातील लोकांना लस द्यावी लागणार आहेत. माकडतापासोबत मलेरीया, लॅप्टो, डेंगू, स्वाइन फ्लू अशा प्रकारच्या साठहून अधिक तापाच्या लसीचे संशोधन होणार आहे.'' 

बक्षीस आणि गौरव... 
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सावंत म्हणाल्या, ""जे कोणी माकड मेल्याची माहिती प्रशासनाला देणार, त्या व्यक्तीचा जिल्हा परिषदेकडून पन्नास रुपये बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. फक्त संबधित माकड तपासणीअंती पॉझिटिव्ह असणे गरजेचे आहे. 

साळे म्हणाले... 
* पुण्याचे ते दोघे ही माकडतापाचे रुग्ण 
* बांद्यातील दीड वर्षाची मुलगी बाधित 
* माकडताप विमा संरक्षणासाठी प्रयत्न 
* फवारणी जास्त केल्यास त्याचा दूरगामी परिणामाची भीती 
* कंट्रोल फायरिंगचा प्रस्ताव अशक्‍य 

Web Title: Dr. yogesh sale sawantwadi