क्रीडा संकुलाचे स्वप्न भंगले 

तुषार सावंत
बुधवार, 22 मार्च 2017

कणकवली - राज्याचे क्रीडा धोरण 2001 नुसार तालुकास्तरीय क्रीडा संकुल बांधकामातील अखर्चित राहिलेला राज्याचा 9 कोटी 27 लाख 64 हजारांचा निधी जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांना वर्ग करण्यात आला आहे. यात सिंधुदुर्गातील कणकवली तालुका क्रीडांगणासाठी मंजूर असलेले 75 लाख रत्नागिरीतील मंडणगड तालुक्‍यासाठी वर्ग करण्यात आल्याने क्रीडांगणाचे स्वप्न आता अधुरे राहणार आहे. 

कणकवली - राज्याचे क्रीडा धोरण 2001 नुसार तालुकास्तरीय क्रीडा संकुल बांधकामातील अखर्चित राहिलेला राज्याचा 9 कोटी 27 लाख 64 हजारांचा निधी जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांना वर्ग करण्यात आला आहे. यात सिंधुदुर्गातील कणकवली तालुका क्रीडांगणासाठी मंजूर असलेले 75 लाख रत्नागिरीतील मंडणगड तालुक्‍यासाठी वर्ग करण्यात आल्याने क्रीडांगणाचे स्वप्न आता अधुरे राहणार आहे. 

देशपातळीवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतात. प्रगत देशांच्या तुलनेत भारतीय खेळाडू ऑलिंपिकसारख्या स्पर्धामध्ये मागे आहेत. ही उणीव भरून काढण्यासाठी राज्य शासनाने 2001 मध्ये क्रीडा धोरण जाहीर केले. याच वेळी क्रीडा स्पर्धामध्ये विभागीय पातळीपासून देशपातळीपर्यंत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत सवलतीचे वाढीव गुणही देण्यात आले. मात्र क्रीडांगणाअभावी गावपातळीवरील मुलांना अशा स्पर्धांना मुकावे लागत होते. त्यामुळे तालुका क्रीडा संकुल, जिल्हास्तरावर राष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आणि विभागस्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल तसेच सुविधा उभारण्याची योजना 26 मार्च 2003 ला शासनाने जाहीर केली. त्यानंतर 21 मार्च 2009 ला तालुका क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा 25 लाखांवरून एक कोटी, जिल्हा संकुलाची 4 कोटींवरून 8 कोटी तर विभागीय क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा 16 कोटींवरून 24 कोटी एवढी वाढविण्यात आली. यासाठी राज्य क्रीडा विकास समितीची स्थापना करून या समितीला विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधांसाठी तांत्रिक, प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. मात्र राज्य क्रीडा विकास समितीच्या 15 डिसेंबर 2016 च्या बैठकीत क्रीडा संकुलाचा आढावा घेतला असता यापूर्वी अनुदान वितरित केलेल्या 109 तालुका क्रीडा संकुलांपैकी 26 तालुका क्रीडा संकुलांकडे निधी अखर्चित असल्याचे लक्षात आले. असा एकूण 9 कोटी 27 लाख 64 हजारांचा निधी तालुका क्रीडा संकुलाकडे विनावापर पडून होता. हा निधी आता बांधकाम अंतिम टप्प्यात आलेल्या आणि प्रगतिपथावर असलेल्या 12 तालुका क्रीडा संकुलांसाठी वर्ग करण्यात आला आहे. 

अखर्चित निधी असलेले तालुके असे - 
जिल्हा रायगड - पोलादपूर, मुरूडजंजिरा 
नंदूरबार - धडगाव/अंकरानी, अक्कलकुवा 
नगर - श्रीरामपूर, राहुरी 
पुणे - जुन्नर 
सोलापूर - मोहोळ 
कोल्हापूर - शिरोळ, पन्हाळा, हातकणंगले 
सातारा - कोरेगाव, खंडाळा, वाई 
सिंधुदुर्ग - कणकवली 
जालना - जालना 
हिंगोली - सोनगाव 
बीड - माजलगाव, केज 
औरंगाबाद - फुलंब्री 
लातूर - जळकोट 
नांदेड - माहूर 
अकोला- अकोला 
यवतमाळ - दिग्रस 
चंद्रपूर - जिवती, चंद्रपूर 

Web Title: Dream corrupt sports complex