esakal | भाडेकरू ठेवताय... सावधान! नाहक त्रासाला जावे लागेल सामोरे
sakal

बोलून बातमी शोधा

Home

भाडेकरूची नोंद पोलिस ठाण्यात करणे बंधनकारक असून, अद्याप नागरिकांनी याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही.

भाडेकरू ठेवताय... सावधान! नाहक त्रासाला जावे लागेल सामोरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर.के.नगर : शहराभोवती विस्तारणाऱ्या उपनगरात मोठ्या प्रमाणात परराज्यातून नागरिक स्थायिक होत आहेत. यातील बहुतांशी नागरिक शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी येतात. जागा भाडेतत्वावर घेऊन वास्तव्य करतात. मात्र, काही अपप्रवृत्तीचे नागरिकही उपनगरात भाडेतत्वावर राहतात. येथे गुन्हा करतात आणि निघून जातात. त्यामुळे उपनगरातील जागा मालकांनी भाडेकरू ठेवताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल. भाडेकरूची नोंद पोलिस ठाण्यात करणे बंधनकारक असून, अद्याप नागरिकांनी याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हे अत्यावश्यक आहे.

शहर पोलिसांनी गेल्या दोन ते तीन महिन्यात सोनसाळखी चोर, दुचाकी चोरटे, बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करणारे यांच्या कारवाई केली. यातील काही आरोपी हे परजिल्ह्यातील असून, ते येथील उपनगरात भाडेतत्वावर राहात होते. ही बाबा समोर आल्यामुळे उपनगरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपनगरात मोठ्या प्रमाणात घरे भाड्याने दिली जातात. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार, विद्यार्थी तसेच बांधाकाम मजूर येथे राहतात.

हेही वाचा: पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’, फडणवीसांच्या दौऱ्यावर टीका

याचबरोबर काही गुन्हेगारी प्रवृत्तचे लोकही राहतात. ते दिवसभर शहरात फिरून पाहाणी करून आणि रात्री घरफोडी, दुचाकी चोरी करतात. त्यानंतर परत आपल्या राज्यात निघून जातात. ज्यावेळी त्यांना अटक होते त्यावेळी ते भाडेतत्वावर राहात असल्याचे पुढे येते. यासाठी उपनगरातील घरमालकांनी जागा भाड्याने देताना भाडेकरूची चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या घरामध्ये कोण आणि किती भाडेकरू राहतात, त्यांची ओळखपत्रांची छायांकीत प्रत पोलिस ठाण्यात जमा करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. जर याची अंमलबजावणी प्रत्येकाने केली तर शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा घालता येईल.

हे करणे आवश्यक

- भाडेकरूंची माहिती घेणे
- आधार कार्ड, पॅनकार्डची छायाकिंत प्रत घ्यावी
- ज्या ठिकाणी भाडेकरू काम करतात तेथील ओळखपत्राची प्रत घेणे
- पोलिस ठाण्यात भाडेकरूंची नोंद करणे.

हेही वाचा: केळीच्या पानावर जेवणे आरोग्यासाठी फायद्याचे; जाणून घ्या कसे

"उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाडेकरू राहातात. मात्र, त्या सर्वांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात होत नाही. घर मालकांनी ही नोंद करणे गरजेचे असून, त्यांना ते बंधनकारक आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे आवश्यक आहे."

- मंगेश चव्हाण, शहर पोलिस उपाधीक्षक

loading image
go to top