मद्यपींनी कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली बाटली

अमित गवळे
रविवार, 9 डिसेंबर 2018

पाली : मध्यधुंद अवस्थेत मार्ग विचारण्यासाठी आलेल्या तरुणांना चांगुलपणाचा सल्ला देणार्‍या पालीतील एका विजवितरण महामंडळाच्या कर्मचार्याच्या डोक्यात या चार मद्यपी तरुणांनी बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (ता.८) रात्री ८ वाजताच्या सुमारास कुंभारशेत गावच्या हद्दीत असलेल्या एका बियरशॉपी जवळ घडली.

यातील तीन तरुणांना पाली पोलीसांनी ताब्यात घेतले असुन एक तरुण पसार झाला आहे. याबाबत पाली पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पालीत राहणारे विजविरण महामंडळाचे कर्मचारी अरुण सखाराम कोंजे (वय. ५४) हे आपली ड्युटी संपवून आपल्या शेताकडे जात होते. वाटेत ते कुंभारशेत गावच्या फाट्याजवळ ठोंबरे बियरशॉपीच्या बाजूला एम. जी. ओसवाल यांच्या कंपाउंडच्या दगडी कठड्यावर बसले होते. यावेळी तेथे मध्यधुंद अवस्थेत चार तरुण आले. त्यांनी कोंजे यांना मुळशी पुणेकडे जाण्याचा मार्ग विचारला. तरुणांची अवस्था पाहून कोंजे यांनी बाळांनो एवढी दारु पिऊन तुम्ही मुळशीला कसे जाणार? या तरुण वयात एवढी दारु पिऊ नका, अपघात होण्याची भिती आहे, तुम्ही आज इथेच थांबा ! असा सल्ला दिला. या गोष्टीचा राग आल्याने मद्यधुंद तरुणांनी हातातील बियरची बाटली कोंजे यांच्या डोक्यात फोडली. यामुळे कोंजे गंभीर जखमी झाले. त्यावेळी या तरुणांनी दुचाकीवर बसून पलायन केले.

काही अंतरावर आल्यावर पालीजवळ या तरुणांनी एका पादचार्‍याला धडक देवून जखमी झाले. यावेळी स्थानिकांनी या तरुणांना पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी प्रविण भरत दिवडे (वय. २०), रफीक जिलानी पठाण (वय. २०) ओमकार चंद्रकांत गुंडाळे (वय. २०) सर्व राहणार कोथरुड पुणे यांच्यावर पाली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढिल तपास पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक तात्यासाहेब सावंजी, पोलीस उपनिरिक्षक नारायण चव्हाण करीत आहेत.

Web Title: The drunken boys broke the boltte on employee's head