कोकण खाद्यपदार्थांचा दरवळ आता दुबईमध्ये... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dubai food festival the taste of khatu spicy food kokan marathi news

गुहागरचा झेंडा आखातात; कोकण महोत्सवात हजेरी; ७ फेब्रुवारीला आयोजन...

कोकण खाद्यपदार्थांचा दरवळ आता दुबईमध्ये...

गुहागर  (रत्नागिरी) : दुबईमध्ये ७ फेब्रुवारीला कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दुबईस्थित मराठी कुटुंबांना कोकणातील लोककला, कोळी नृत्य, खाद्य संस्कृती आदींचा आस्वाद घेता येणार आहे. याच महोत्सवात आयोजकांनी महाराष्ट्रातील काही उद्योजकांना निमंत्रित केले आहे. त्यामध्ये गुहागरच्या खातू मसाले उद्योगाचा समावेश आहे.

सॉलिटरी इव्हेन्टस्‌ या संस्थेतर्फे गेली दोन वर्षे दुबईमध्ये कोकणी मेळा आयोजित केला जातो. या वर्षी तिसरा कोकणी मेळा ७ फेब्रुवारीला झबील पार्क, दुबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळ्यात महाराष्ट्रातील काही निमंत्रित उद्योजकांमध्ये गुहागरच्या खातू मसाले उद्योग समूहाबरोबरच औंधेकर आटा, वसई रेस्टॉरंट, कोकण बॅंक, माही प्रिंटर्स आदींचा समावेश आहे. 

हेही वाचा- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सीईओपदी हेमंत वसेकर रुजू

दुबईकर चाखणार खातू मसाल्याची चव
दुबईमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रातील कुटुंबांचे संमेलन व्हावे, आपली संस्कृती दुबईवासीयांना समजावी, या हेतूने हा मेळा घेतला जातो. मेळ्यात कोळी नृत्य, अन्य लोककला, खालूचा बाजा, लेझीम नृत्य, कोकणी भाषेतील स्कीट यांचे सादरीकरण होणार आहे. कोकणातील खाद्यपदार्थांची रेलचेल महोत्सवात असणार आहे. यामध्ये पेयपानात (वेलकम ड्रिंक) कोकम सरबत, पन्हे, सोलकढी यांचा समावेश आहे, तर मोदक, घावन घाटले, सांडगे, कोकणी पद्धतीने केलेला मत्स्याहार, मांसाहार यांचा समावेश आहे. गुहागरमधील उद्योजकाला परदेशात अशी संधी प्रथमच मिळत आहे. त्यामुळे गुहागरातील व्यापाऱ्यांसह अनेकजणांनी खातू मसाले उद्योग समूहाला दुबई वारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- सिंधुदुर्गात दीडशे शिक्षक वरिष्ठ श्रेणीपासून वंचित

गुहागरचे नाव जाईल देशभरात 

खातू कुटुंबाचे अभिनंदन. साता समुद्रापार जाण्याची संधी मिळाल्याने पुढील १० वर्षांत अनेक देशांत आपली उत्पादने पोचतील. आपल्याबरोबर गुहागरचे नाव मोठे होईल. आम्हाला तुमचा अभिमान आहे. वडिलांच्या अथक परिश्रमाला मुलांची साथ मिळाली. मनापासून शुभेच्छा.
- राजन दळी, कृपा औषधालय, धोपावे

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणूका लढविण्यासाठी `येथे` काँग्रेसची तयारी

व्हेज पुलाव, कोकणी वडे, चिकनची चव
याबाबत बोलताना शैलेंद्र खातू म्हणाले की, कोकण मेळ्यामध्ये खातू मसालेचा स्टॉल असणार आहे. दुबईवासीय कोकणी लोकांना खातू मसाले तर मिळतीलच; शिवाय मोदक पिठातील उकडीचे मोदक, व्हेज पुलाव, कोकणी वडे, चिकन यांची चवही चाखायला मिळणार आहे.