Kokan : डंम्पिंग ग्राउंड एमआयडीसी जागेत

कुडाळच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांना गती
Dumping ground
Dumping groundSakal

कुडाळ : शहरातील बहुचर्चित डंपिंग ग्राउंड प्रश्न आता सुटणार आहे. डंम्पिंगसाठी एमआयडीसीत जागा उपलब्ध झाली आहे. दीर्घकाळ अडकलेल्या या प्रश्नाच्या सोडणुकीसह येत्या काही महिन्यांत नगरपंचायत हद्दीतील अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील, अशी माहिती नगराध्यक्ष आफ्रिन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाठ यांनी ‘सकाळ’ला दिली. येथील नगरपंचायत हद्दीतील प्रलंबित सार्वजनिक विकासकामे मार्गी लावण्यासाठी नगरपंचायत सज्ज झाली आहे. विविध सार्वजनिक विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी आला असून वर्षभरात हे प्रश्न मार्गी लागतील. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलेल असेही त्यांनी सांगितले.

शहरातील विविध विकासकामांबाबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ‘‘शहरासाठी डंम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गेली बरीच वर्षे फार मोठी समस्या ठरला होता. यासाठी उपोषणे, आंदोलने झाली. त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष विनायक राणे यांनी डंम्पिंगसाठी जागा दिली होती. त्यापूर्वी हे डंम्पिंग स्मशानभूमी असलेल्या भंगसाळ नदीनजीक होते. बरीच वर्षे या ठिकाणी असल्यामुळे लक्ष्मीवाडी या ठिकाणी वस्ती असणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत होता. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. अशावेळी हा प्रश्न मार्गी लावण्याचा दृष्टिकोनातून नगरपंचायतीच्या माध्यमातून तात्पुरता प्रश्न माजी नगराध्यक्ष राणे यांच्या माध्यमातून सुटला होता. सातत्याने डंम्पिंगचा प्रश्न उपस्थित होत असताना त्यासाठी जागा शोधण्यात आली. शेवटी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध झाली असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.’’

इतर रखडलेल्या व प्रस्तावित विकासकामांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘‘कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त कुडाळ शहराला ऐतिहासिक वारसा आहे. कुडाळ ग्रामपंचायत अस्तित्वात असताना विकासाच्या अनेक अडचणी येत होत्या. विकासनिधीही कमी असल्याने शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी अडचणी येत होत्या.

‘डंम्पिंग ग्राऊंड’ एमआयडीसी जागेत

नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासात्मक दिशा दिसू लागली. तत्कालीन नगराध्यक्ष राणे व ओंकार तेली सर्व नगरसेवक व नगरपंचायत प्रशासन यांच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात आले. सुरुवातीला पहिल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतील नगरपंचायतचा विकासात्मक कारभार पाहता अनेक विकासकामे झाली. अद्ययावत स्मशानभूमी, जिल्ह्यातील पहिला सेल्फी पॉईंट अशी अनेक कामे मार्गी लागली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीमचे नगरपंचायतील सत्तेचे स्थान होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक विराजमान झाल्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे या माध्यमातून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नगरपंचायतीच्या सर्वांगिण विकासासाठी सार्वजनिक कामांसाठी त्यावेळी कोट्यावधी निधी आला होता. अडीच वर्षानंतर महाविकास आघाडी सरकारनंतर राजकीय डावपेचातुन राज्यातील सत्येची समीकरणे बदलली. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले; मात्र नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी कुडाळ नगर सहाय्य अनुदान, नगरोत्थान आदी माध्यमातून कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे.

बालोद्यानासाठी ७१ लाख

तहसील कार्यालयाच्या बाजूला मंजूर बालोद्यानासाठी ७१ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. शहरात भाजीमार्केटचा प्रश्न गेली काही वर्षे अडकला आहे. त्यामुळे जिजामाता चौक ते गवळदेव या परिसरात भाजीविक्रेते बसल्याने भाजी मार्केट हा परिसर ओस पडलेला आहे. या भाजी मार्केटसाठी भूसंपादन करायचे आहे. संबंधित जमीन मालकाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com