गणेशोत्सव काळात महामार्गावर आरोग्य पथक राहणार 24 तास कार्यरत

During the Ganesh festival 24 hour Health workshop will be held on the highway
During the Ganesh festival 24 hour Health workshop will be held on the highway

महाड : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या मदतीसाठी आरोग्य विभागही सज्ज झाला आहे. मुंबई-पुणे व मुंबई-गोवा महामार्गावर तेरा ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक 24 तास कार्यरत राहणार आहे.

24 तास वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व औषधनिर्माता या पथकात असणार आहेत. याशिवाय चार वाहतूक पोलिस केंद्रावर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही तैनात केलेली आहे. आरोग्य विभागाचे पथक 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर तर रुग्णवाहिका 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत सज्ज आहेत.

कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची उद्यापासून वर्दळ सुरु होणार आहे. महामार्गावर वाढती वाहतूक लक्षात घेता अपघाताचीही शक्यता निर्माण होते तर प्रवाशांना केव्हाही वैद्यकीय गरज भासू शकते, हे लक्षात घेऊन रायगड आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

26 वैद्यकीय अधिकारी, 13 आरोग्यसेविका व 12 औषधनिर्माता ही सेवा देणार आहेत. याशिवाय108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करणार आहेत. गणेशभक्तांना वैद्यकीय सुविधेत कोणतीही कमतरता भासणार नाही. याची खबरदारी आरोग्य विभाग घेत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॅा.अजित गवळी यांनी सांगितले

येथे आहेत आरोग्य पथक 
कर्जत फाटा,कळंबोली,गव्हाणफाटा,अजिवली,वडखळ,नागोठणे,वाकण,कोलाड,इंदापूर, माणगाव,लोणेरे,चांभारखिंड(महाड), व पोलादपूर

या पोलिस मदत केंद्रावर रुग्णवाहिका
पळसपे ,वाकण, महाड ,कशेडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com