Sudhagad Earthquake
Sakal
कोकण
Sudhagad News : सुधागड तालुक्यातील गावांमध्ये धरणीकंपाची भीती; भूवैज्ञानिक पाहणीची मागणी
Sudhagad Earthquake : सुधागड तालुक्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार जमिनीला हादरे बसत असून, ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त होत आहे.
पाली : सुधागड तालुक्यातील महागाव, चंदरगाव, कळकराई, भोप्यांचीवाडी, खांडपोली, वाघोशी, देऊळवाडी, कोंडप, कवेळेवाडी आदी डोंगरपट्टीतील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार जमिनीला जबरदस्त हादरे बसत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भीती व दहशतीच्या छायेत आहेत. भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने तातडीने गावांची पाहणी करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा मंगळवारी (ता. 16) येथील ग्रामस्थांनी दिला.

