भाजीपाला उत्पन्नातून महिलांचे आर्थिक साक्षमीकरण 

Economic empowerment of women through vegetable income
Economic empowerment of women through vegetable income

साखरपा : नजीकच्या देवळे येथे परसबाग प्रकल्पातून महिलांनी भाजीपाला उत्पन्न घेण्यास प्रारंभ केला आहे. उमेद संस्थेच्या पुढाकारातून बचत गटांना प्राधान्य देत, केवळ सेंद्रिय खतांवर भाजीपाला तयार करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे.


बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षम व्हाव्यात या उद्देशाने उमेद ही संस्था प्रयत्नशील आहे. त्याच अभियानाचा भाग म्हणून पालेभाजा निर्मिती करण्यात येत आहे. बचतगटांच्या माध्यामातून महिलांना एकत्र करून घराच्या आवारात भाजीपाला निर्मिती केली जात आहे. देवळे येथील बचतगट नूतन आणि दत्तागुरू या दोन बचत गटांच्या महिलांनी उज्ज्वला नवाले आणि नूतन गार्डी  या अध्यक्षांनी पुढाकार घेत हा प्रकल्प त्यांच्या शेतात राबविला आहे. या महिलांना सीआरपी प्रणाली सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य सखी म्हणून काम करणार्‍या दीपिका कदम यांनी माहिती दिल्याप्रमाणे आठवडा बाजारातून आणलेल्या भाज्यांची प्रत आणि पौष्टिकता आपल्याला माहीत नसते. रासायनिक खतांवर तयार झालेल्या निकृष्ट दर्जाच्या भाज्या खालल्यामुळे आरोग्य धोक्यात येते. यावर उपाय म्हणून घरच्याघरी तयार केलेल्या आणि सेंद्रिय खतांवर पिकावलेल्या भाज्या सर्वात चांगल्या. हाच उद्देश ठेऊन उमेद संस्थेने हा प्रकल्प हाती घेतला आहे.  

या वाफे तयार केले आहेत. सर्वसाधारण एका कुटुंबाला सर्व प्रकारच्या भाज्या या परसबागेतून मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वात आत, केंद्रस्थानी मेठा खड्डा करून त्यात शेण, पालापाचोळा घालून वाफ्याला लागणारे कंपोस्ट खत जागेवरच केला आहे. त्यानंतर आतून बाहेर पालेभाज्या, फळभाज्य, वेलवर्गीय भाज्या आणि सर्वात बाहेत भेंडी, झेंडू या सारखी झाडे लावण्यात आली आहेत. 

गुरुवारी या बचतगटांच्या महिलांनी परसबागेतील भाजीपाल्याची स्थानिक बाजारपेठेत विक्री करून पहिले उत्पन्न मिळवले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com