

कोकणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
esakal
Konkan Political News : राज्यात महायुती सत्तेवर आहे. त्यामुळे युतीतून लढणे आवश्यक होते; पण भाजपने स्वबळाचा निर्णय घेतला असेल तर आमचीही स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे. या निवडणुका आम्ही जिंकू; मात्र एकत्र न लढल्याने ठाकरे शिवसेनेच्या जागा आल्यास भाजपचा निर्णय त्याला जबाबदार राहील, असा इशारा शिंदे शिवसेनेचे नेते तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.