चिपळुणात वर्षभर रंगणार निवडणुकीचा माहोल 

Election atmosphere will be colorful in Chiplun throughout the year
Election atmosphere will be colorful in Chiplun throughout the year

चिपळूण ( रत्नागिरी ) - दोन दिवसांनी नवीन वर्षाची सुरवात होणार आहे. येणारे वर्ष शहरासाठी अनेक आव्हाने घेऊन येणार आहे. याच वर्षात पालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीआधीचा माहोल वर्षभर रंगणार आहे. 

कोविडसारख्या महामारी काळातही पालिकेत आरोप - प्रत्यारोपाची परंपरा कायम राहिली. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्षांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी झाली. नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी लावण्यात आली.

बजेटवर आक्षेप घेण्यात आला. महाविकास आघाडीने काही ठराव केले त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला आहे. अनेक नागरी कामांना बगल देण्यात आली. शिवसेनेकडे तीन कॉंग्रेसला दोन आणि राष्ट्रवादीला एक समिती मिळाली आहे. सभापतीपदाच्या माध्यमातून निवडणुकीची मशागत करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह भाजप प्रयत्न करणार आहे. 

डिसेंबर अखेर पालिकेची निवडणूक होईल. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी झाली; मात्र निवडणुकीत ही महाविकास आघाडी कायम राहण्याची शक्‍यता कमी आहे. घटक पक्षांनी स्वतंत्र लढण्याची तयारी आतापासून केली आहे. या निवडणुकीत भाजपचेही अस्तित्व स्पष्ट होणार आहे.

कोकणातील एकमेव पालिका भाजपकडे असल्यामुळे राज्य सरकारनेही चिपळूण पालिकेला निधीच्या रूपाने बळ दिले. त्यामुळे चार वर्षात शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली. या कामांचे मतांमध्ये रूपांतर होणार की कसे हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. भाजपला कात्रीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीकडून वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण होणार भाजप त्याचा कसा सामना करतो, याची उत्सुकता आहे. 

पालिकेतील पक्षीय बळ 
शिवसेना -11 
कॉंग्रेस - 05 
भाजप - 05 
राष्ट्रवादी - 04 
अपक्ष - 02 


चिपळूण पालिकेत कॉंग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. ही संख्या आणखी वाढवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न असेल. कोणाशी आघाडी करायची हे वरिष्ठ ठरवतील. आघाडी झाली तर समाधानकारक जागांसाठी कॉंग्रेसचा आग्रह असेल. 
- लियाकत शाह, शहरप्रमुख कॉंग्रेस 


मागील चाळीस वर्षात शहरात न झालेली विकासकामे झाली. भाजपला रोखणे शक्‍य नाही, त्यामुळेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या कुबड्या शिवसेनेने घेतल्या आहेत. कोणी किती राजकारण केले किंवा वल्गना केल्या तरी भाजपला चांगले यश मिळेल. 
- आशिष खातू, शहरप्रमुख भाजप 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com