वाढीव वीज बिलाचा ग्राहकांना फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

सावंतवाडी - कंत्राटी कामगारांच्या चुकांचा फटका जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सहन करावा लागला आहे. बिलाची रक्कम कमी करून देतो, असे सांगणाऱ्या वीज अधिकाऱ्यांनी फक्त तक्रार घेऊन येणाऱ्या लोकांचीच बिले दुरुस्त केली आहेत. त्यामुळे हा प्रकार हाजीर तो वजीर असल्याचे अधिकाऱ्यांचे धोरण दिसत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. 

सावंतवाडी - कंत्राटी कामगारांच्या चुकांचा फटका जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सहन करावा लागला आहे. बिलाची रक्कम कमी करून देतो, असे सांगणाऱ्या वीज अधिकाऱ्यांनी फक्त तक्रार घेऊन येणाऱ्या लोकांचीच बिले दुरुस्त केली आहेत. त्यामुळे हा प्रकार हाजीर तो वजीर असल्याचे अधिकाऱ्यांचे धोरण दिसत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. 

महावितरणची बिले डिजिटल करण्याच्या नादात जिल्ह्यात रीडिंगचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी उशिरा रीडिंग घेतले. या सर्व गडबडीत युनिट बिल रकमेचा स्लॅब बदलल्याने डिसेंबरमधील बिले भरमसाट आली. 
जिल्ह्यातील वीज ग्राहकांना डिसेंबर महिन्यात वाढीव बिलांना सामोरे जावे लागले. बिलिंग आकारण्याची यंत्रणा सक्षम करण्याच्या नादात, तसेच नव्याने ॲप सुरू करण्यात येणार असल्याने ही समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे ५०० रुपये बिल येणाऱ्या ग्राहकाला तब्बल १००० ते ११०० रुपये बिल आकारण्यात आले होते. 

हा सर्व प्रकार कंत्राटी कामगारांनी वेळेनंतर बिल आकारणी केल्याने घडला होता, असे खुद्द महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. तसेच जो ग्राहक आपल्या कार्यालयात बिल जास्त आल्याची तक्रार घेऊन येईल, त्याचे बिल कमी करून देण्याचे आश्‍वासन कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडून देण्यात आले.

जरी अधिकारी वर्ग सकारात्मक असले तरी अनेक ग्राहकांना याबाबतची माहितीच न मिळाल्याने त्यांनी आपली बिले आलेल्या रकमेत भरली. त्यामुळे त्यांना हा फटका सहन करावा लागला आहे.

बिल कमी करून देणे सुरू
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जे ग्राहक बिल जास्त आल्याची तक्रार घेऊन कार्यालयात आले, त्यांचे बिल कमी करून देण्यात आले. त्यासाठी संबंधित ग्राहकांकडून अर्ज घेण्यात आले. हाजीर तो वजीर असाच प्रकार थोडक्‍यात घडला असल्याचे त्यांनी मान्य केले. दरम्यान, जे तक्रार घेऊन आले नाहीत, त्यांचे काय? असा प्रश्‍न केला असता त्यांनी आपण काहीच करू शकत नाही, असे सांगितले.

Web Title: electricity bill increase

टॅग्स