निवेदिता प्रतिष्ठानने बनवल्या प्लास्टिकपासून वीटा, शाेभिवंत वस्तू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

रत्नागिरी - प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असतानाच दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानने प्लास्टिकचा पुनर्वापर करत विटा, बाकडे, स्टूल आणि फुटपाथ किंवा कंपाऊंड वॉल केले. कचरा, प्लास्टिक व वीस टक्के सिमेंटपासून विटा बनवून त्यावर पावसाचे परिणाम नोंदविण्यात आले.

रत्नागिरी - प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असतानाच दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानने प्लास्टिकचा पुनर्वापर करत विटा, बाकडे, स्टूल आणि फुटपाथ किंवा कंपाऊंड वॉल केले आहेत,  अशी माहिती अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री परांजपे म्हणाले, कचरा, प्लास्टिक व वीस टक्के सिमेंटपासून विटा बनवून त्यावर पावसाचे परिणाम नोंदविण्यात आले. थर्माकोलपासून गम (ग्ल्यू) केले. लवकरच शेण गोमूत्रापासून प्रेझेंट पाकिटे, जी वापरानंतर फाडून कुंडीत टाकल्यावर झेंडूची रोपे तयार होतात अशी पाकिटे तयार होतील.

ते म्हणाले की, संस्थेने रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्लास्टीक संकलन केंद्र सुरू केले आहे. यामध्ये प्लस्टीकच्या पाण्याच्या आणि थंड पेयांच्या बाटल्या स्वीकारल्या जातात. जिल्ह्यातील हे पहिले संकलन केंद्र आहे. प्लास्टिक बाटल्यांचा उपयोग करून प्रतिष्ठानने फुले व गिफ्ट आर्टिकल्स केली आहेत. फ्लेक्स बॅनरपासून ऑफिस फोल्डर केला आहे.

प्रतिष्ठानची कामगिरी - 

  • जालगावमधील सिद्धीविनायक रेसिडेंन्सी कचरामुक्त केले
  • ओल्या कचर्‍याचे खत, प्लास्टीकचा पुनर्वापरस सांडपाणी प्रक्रियेतील पाणी झाडांना वापरले जाते.
  • प्रतिष्ठानने सॅनिटरी नॅपकीन डीस्ट्रॉयरची अवघ्या पाच हजार रुपयात उपलब्धता केली आहे.
  • प्रतिष्ठानाने शंभर टक्के नैसर्गिक सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धताही केली आहे. हे नॅपकीन आठ दिवसात जमिनीत मिसळतात.

43 हजार किलो प्लास्टिक कचरा पुनर्वापर

मार्चमध्ये दापोलीत एका कार्यक्रमात केंद्रीयमंत्री अनंत गीते यांना प्रत्येक तालुक्यात कचरा पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र अजून त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टानुसार 43 हजार किलो कचरा प्लास्टिक कचरा प्रतिष्ठानकडे पाठवावा, त्याचे नियोजन करून त्याचा पुनर्वापर करण्याचे निवेदन दिले होते.

स्वच्छता अभियानाचा फज्जा

स्वच्छता अभियान आणि पर्यावरण रक्षणात केंद्र आणि राज्य शासनालाही गांभीर्य दिसत नाही. रायगड, ठाणे आणि मुंबईच्या काही भागांच्या सर्वेक्षणानंतर कॅरिबॅग बंदीचा बोजवारा उडल्याचे दिसून आले. यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याचे काम करतोय, असे परांजपे यांनी सांगितले.

Web Title: Elegant objects made from plastic