थकबाकी न दिल्यास सेझा कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

मुरगाव -  सेझा मायनिंग कॉर्पोरेशनच्या कामगारांनी आज सकाळी वास्को येथील केंद्रीय मजूर आयुक्तांच्या कार्यालयात धडक देऊन कामगारांची थकबाकी न दिल्यास 25 मे पासून साखळी उपोषण करण्याची नोटीस बजावली.

गोव्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने खाण कामगार अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. कामगारांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. कामगारांची थकबाकी देखील अडकली आहे.

सेझा कामगारांची गेल्या कित्येक काळाची थकबाकी कंपनीने दिलेली नाही. त्यामुळे ती मिळावी यासाठी सेझा कामगार संघटनेने सर्व कामगारांना घेऊन आज वास्को येथील केंद्रीय मजूर आयुक्तांचे दरवाजे ठोठावले.ही थकबाकी न मिळाल्यास 25 मे पासून, साखळी उपोषण करण्याचा इशारा यावेळी संघटनेने सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे

Web Title: employees' chain fasting if they do not get money