11 डिसेंबर पासुन महाडमधील रस्ते व नागरिक मोकळा श्वास घेणार

3images_16.jpg
3images_16.jpg

महाड : महाड शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी महाड नगरपालिकेने  11 डिसेंबर पासुन मोहिम होती घेण्याचे निश्चित केले असुन 13 डिसेंबर पर्यंत हि मोहिम चालणार आहे. स्वच्छता सर्वेक्षणात शहराच्या सौंदर्याकरणात अशी बांधकामे बाधा आणत असल्याने पालिकेने हि पावले उचलली आहेत. यासाठी पोलिस बंदोबस्तही घेतला जाणार आहे. 

महाड नगरपालिका हद्दीत वाटेल त्या प्रकारे बांधकामे करण्यात आलेली आहेत. कोणीही उठतो आणि रस्त्याकडेला गाळा सुरु करतो, टपरी टाकतो अशी स्थिती सध्या शहरात आहे. महाड बाजारपेठ व इतर ठिकाणी तर दुकानदारांनी दुकाना बाहेर अनधिकृत शेड टाकलेल्या आहेत .याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झालेला आहे. या सर्वांना आता चाप बसणार आहे. पालिकेने महाड शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी जाहीर आवाहन केलेले आहे. शहरातील सुमारे 170 जणांना या बाबत नोटिसा बजावल्या आहेत. या सर्वांनी स्वखर्चांनी आपली बांधकामे 11 डिसेंबर पूर्वी हटवावीत अन्यथा पालिका ती करेल व त्याचा खर्च संबंधीत बांधकाम करणाऱ्यांकडून वसुल केला जाणार आहे. नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात भाग घेतलेला आहे. शहरातील स्वच्छता करतांना हि बांधकामे स्वच्छता कामात अडथळा ठरत आहेत व त्यामुळे शहर सौंदर्यीकरणालाही बाधा पोहतचे. यामुळे पालिकेने वृत्तपत्रातही याबाबत नोटीस प्रसिध्द केलेली आहे. अनधिकृत पत्राशेड,टपऱ्या, खोके, अनधिकृत टॉवर, भंगार व्यवसायपालिकेच्या जागेतील अनधिकृत गोठे, झोपड्या व अनधिकृत बांधकामे काढली जाणार आहेत. यासाठी पालिकेने पोलिस बंदोबस्तही मागवलेला आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील रस्ते व नागरिक मोकळा श्वास घेतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

''शहरात अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे करणा-यांना नोटिसा बजावलेल्या आहेत.जे दिलेल्या मुदतीत हि बांधकामे हटवणार नाहीत त्यांच्या विरोधात बांधकामे हटवण्याची कारवाई केली जाणार आहे.''
- जीवन पाटिल ( मुख्याधिकारी,महाड नगर परिषद)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com