esakal | यंदा महाशिवरात्रीला कुणकेश्‍वरमध्ये प्रवेश बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बोलून बातमी शोधा

entry for kunkeshwar in korean not allowed order of collector in sindhudurg}

महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्‍वरला यात्रा भरते; मात्र यंदा उत्सव गावपातळीवर होणार आहे.

यंदा महाशिवरात्रीला कुणकेश्‍वरमध्ये प्रवेश बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथील यात्रोत्सव यंदा गाव पातळीवर होणार आहे. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर काल (3) जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत महत्वाच्या सुचना देण्यात आल्या. उत्सव काळात बाहेरील नागरिक, पर्यटकांना कुणकेश्‍वरला जाता येणार नाही. यासाठी कुणकेश्‍वरकडे जाणाऱ्या मार्गावर बंदोबस्त राहणार आहे. मंदीरातील पुजारी, विश्‍वस्त, देवस्थानचे कर्मचारी आदींनी खबरदारी म्हणून ऐच्छिक कोविड चाचणी करून घेतल्यास सोयीचे होईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 

महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्‍वरला यात्रा भरते; मात्र यंदा उत्सव गावपातळीवर होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक कुणकेश्‍वर येथे झाली. यावेळी प्रशासनाकडून परिसराची पहाणी करण्यात आली. यावेळी पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, येथील परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार मारूती कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब तसेच कुणकेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वाळके यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न -

मोजक्‍या माणसांच्या उपस्थितीत देवस्थानमधील महाशिवरात्रीनिमित्त होणारे धार्मिक विधी पार पाडावेत. त्याचबरोबर बाहेरील भाविक व इतर नागरिकांनी उपस्थित राहू नये म्हणून नाकाबंदी करावी. सर्वांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून यात्रा पार पाडावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. केवळ धार्मिक विधीसाठी कुणकेश्‍वरमधील महाशिवरात्रोत्सव होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक काळजी घेतली जावी, बाहेरील मंडळीनी कुणकेश्‍वर दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे. 

संपादन - स्नेहल कदम