अन्यथा...गृहराज्यमंत्र्यांना खेळण्यातले विमान कुरिअरने पाठवणार 

अन्यथा...गृहराज्यमंत्र्यांना खेळण्यातले विमान कुरिअरने पाठवणार 

कुडाळ - गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावर्षी गणेश चतुर्थीला चिपी विमानतळ सुरू होणार असल्याची घोषणा केली होती; मात्र अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही. जर या वर्षी चतुर्थीला विमानसेवा सुरू झाली नाही, तर केसरकर यांना खेळण्यातले विमान कुरिअरने पाठवणार, अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. 

श्री. उपरकर म्हणाले, ' चिपी विमानतळाच्या संबंधातील असणाऱ्या अडचणी दूर झाल्यास व विमान सेवा सुरळीत व नियमित सुरू झाली तर जिल्ह्यातील चाकरमान्याकरिता चांगली प्रवाशी सुविधा निर्माण होऊ शकेल. यासाठी उद्या (ता.27) विधान परिषद आमदार किरण पावसकर व मी चिपी प्रकल्प व्यवस्थापकांची भेट घेणार आहे.

आमदार पावसकर म्हणाले,  जिल्ह्यातील चिपी परुळे विमानतळ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झालेला आहे. त्याचे मार्चमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्‌घाटन पार पडले. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावर्षी चिपी विमानतळ सुरू होणार असल्याची घोषणा केली होती; मात्र अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही. त्या संदर्भात असलेल्या समस्यांची माहिती घेण्यासाठी विमानतळावरील विद्युत, पाणी, रस्ता केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या परवानग्या व त्यामध्ये येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यासाठी मी व माजी आमदार परशुराम उपरकर व जिल्ह्यातील काही मुख्य पदाधिकारी या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या (ता.27) दुपारी तीन वाजता भेट देणार आहोत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com