Vidhan Sabha 2019 : सावंतवाडीचा आमदार स्वाभिमानचाच

Vidhan Sabha 2019 : सावंतवाडीचा आमदार स्वाभिमानचाच

सावंतवाडी - संजू परब यांना ज्या पदावर न्यायचे आहे, तिथे नीलेश राणे व नारायण राणे नक्‍कीच नेणारच. कोणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी, सावंतवाडीचा पुढचा आमदार हा स्वाभिमान पक्षाचाच असेल, असे माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे स्पष्ट केले. श्री. परब यांनी खूप वाढदिवस साजरे केले; मात्र यावर्षीच भेटून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते काय वर्षाचे झाले नाहीत. पाच वर्षात कामे केली असती, तर ही वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला.

माजी खासदार राणे व आमदार नीतेश राणे यांनी काल (ता.१९) सायंकाळी उशिरा सावंतवाडीत येत संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, नीलेश राणे यांनी परब यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘आज याठिकाणी संजू परब यांना भेटून कोणी कितीही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करो. एक विरोधक कमी केला तर ती मते आपल्याला मिळतील, या आशेवर कोणी राहू नये. येणाऱ्या काळात सावंतवाडीचा आमदार हा स्वाभिमानचाच असेल. संजू परब यांचे वाढदिवस यापुढेही होतील; पण आमदार झाल्यावर जो जल्लोष असेल, तो संपूर्ण कोकण पाहत राहील. त्यामुळे येणारी विधानसभा संजू यांनी नारायण राणे यांच्यासाठी लढविण्यासाठी तयार राहावे. माजी शिक्षण आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर आरिवडेकर, पालिका गटनेते राजू बेग, गुरूनाथ सावंत, ज्ञानेश्‍वर सावंत, राजू परब, उपसभापती संदिप नेमळेकर, मनोज नाटेकर, सनी कुडाळकर, समिर पालव आदी उपस्थित होते.

संजू परब हे निलेश राणे सोबतच राहणार
ते म्हणाले, ‘‘संजू परब हा केवळ स्वाभिमानचा तालुकाध्यक्षच नाही, तर मी त्याला माझ्या घरातला सदस्यच समजतो, हे अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. आज याठिकाणी मी आलो, ते संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. बाकिचे आले ते राजकारण करण्यासाठी; मात्र कोणी कितीही बुके घेऊन आले, तरीही जिथे निलेश राणे आहे, तिथे मरेपर्यत संजू परब निलेश राणे सोबतच राहणार.’’ 

निलेश राणेंसोबतच नेहमी राहणार...
श्री. परब म्हणाले, ‘‘मी एवढे वाढदिवस साजरे केले; पण आजचा वाढदिवस वेगळा होता. विरोधकांनी मला भेटून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निलेश राणे यांचे माझ्यावर नेहमी प्रेम राहीले आहे. राजकारणात चढ उतार असतात व ते असावेच लागतात; पण आज मी माझे घर सोडून चाललो, असा संभ्रम विरोधकांनी करून दिला; मात्र मी निलेश राणेंसोबतच नेहमी राहणार. त्यांचे व नारायण राणेंचे आर्शिवाद माझ्यावर कायम असावेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com