आंदुर्लेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गाडी जाळण्याचा प्रकार

अजय सावंत
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

कुडाळ - आंदुर्ले येथील शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी सरपंच संतोष पाटील यांची मोटार अनोळखी व्यक्तीने जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काल रात्री साडेबाराच्या सुमारास घडला. सिंधूदुर्गात ऐन निवडणुकीत सावंतवाडीनंतर या दुसऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे शिवसेनेने या घटनेचा निषेध करत विकृत प्रवृतीचा शीघ्र गतीने तपास करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली 

आंदुर्ले येथील निवासस्थानी श्री पाटील यांनी गाडी लावली.  मध्यरात्री अनोळखी व्यक्तीने पेटती मशाल त्यांच्या गाडीत ठेवली. श्री पाटील यांनी हा प्रकार पाहिला. परंतु गाडी जळेल या उद्देशाने त्यांनी संबंधित व्यक्तीचा पाठलाग केला नाही. यात गाडीचा आतील भाग जळून खाक झाला.  

दरम्यान याबाबत निवती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. एका अभ्यासू समाजसेवी कार्यकर्त्या विरोधात घडलेल्या या निंदनीय दहशतीच्या प्रकाराचा शिवसेनेने जाहीर निषेध केला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, संजय पडते, जान्हवी सावंत, राजन नाईक, संदेश प्रभू, सुबोध माधव, अनुप नाईक, संदीप म्हाद्धेश्वर, नितीन सावंत उपस्थित होते.    

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची गाडी जाळण्याचा प्रकार ताजा असतानाच पाटील यांची गाडी जाळण्याची घटना घडल्याने राजकीय खळबळ उडाली आहे . 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EX Sarpanch Santosh Patil motar burnt in Andurle