esakal | सिंधुदुर्गात ऑक्सीजन स्फोटची 'ती' अफवाच
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात ऑक्सीजन स्फोटची 'ती' अफवाच

सिंधुदुर्गात ऑक्सीजन स्फोटची 'ती' अफवाच

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधूदुर्गनगरी येथील ऑक्सीजन प्लांटमध्ये रविवारी मध्यरात्री नंतर स्फोट सदृश्य आवाज झाला. मात्र, स्फोट झालेला नसून ऑक्सीजन सिलेंडर कनेक्शन लूज लागल्याने सिलेंडर मधील ऑक्सीजन प्रेशरने बाहेर आला. त्यावेळी मोठा आवाज झाला, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यानी दिली.

सिंधूदुर्गनगरी येथील डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये सेंटर ऑक्सीजन लाइन सिस्टीम करण्यात आलेली आहे. यामध्ये दर तासाला १० जंबो सिलिंडर बदलले जातात. त्यात २४ जंबो सिलिंडर असतात. ते बदलण्यासाठी मँनीफोल्ड लावलेले असतात. ३ रोजी मध्यरात्री दोन जंबो सिलिंडरला कनेक्टर लावत असताना ते सुटून सिलिंडरमधील दाबामुळे मोठा आवाज झाला. या आवाजामुळे ऑक्सीजन स्फोट झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आहे.

हेही वाचा- कोकणात हापूस उत्पादन घटले; "इंडियन अल्फान्सो' ला डिमांड

मात्र, प्रत्येक्षात ऑक्सीजन स्फोट झालेला नसून ऑक्सीजन सिलिंडर जोडत असताना कनेक्टर व्यवस्थित लागला नाही. त्यामुळे यातील ऑक्सीजन दाबामुळे बाहेर आला. त्यामुळे हा आवाज झाला आहे. यामुळे कोणतीही दुखापत, जीवितहानी झालेली नाही, असेही डॉ पाटील यानी सांगितले.

Edited By- Archana Banage

loading image