esakal | चाकरमान्यांसाठी खुषखबर ! खेड, देवरूख आगारामधून मुंबई, पुण्यास जादा गाड्‌या 
sakal

बोलून बातमी शोधा

Extra Bus From Khed Devrukh Depot To Mumbai Pune

दरवर्षी चाकरमानी एस. टी. बसेससह रेल्वे गाड्यांनी लाखोंच्या संख्येने गावी येत असतात. यंदा कोरोनाचा वाढता फैलाव अन्‌ विलगीकरणाच्या प्रक्रियेमुळे चाकरमान्यांनी गावाकडे पाठच फिरवली. गणरायाच्या आगमनापूर्वी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमधून 7 दिवसांत केवळ 638 चाकरमानीच गावी दाखल झाले.

चाकरमान्यांसाठी खुषखबर ! खेड, देवरूख आगारामधून मुंबई, पुण्यास जादा गाड्‌या 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

खेड ( रत्नागिरी ) -  गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे येथून आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी येथील आगाराकडून 27 ते 29 ऑगस्टपर्यंत तब्बत 91 जादा बसफेऱ्याचे नियोजन केल्याची माहिती आगारप्रमुख प्रशांत करवंदे यांनी दिली. 

दरवर्षी चाकरमानी एस. टी. बसेससह रेल्वे गाड्यांनी लाखोंच्या संख्येने गावी येत असतात. यंदा कोरोनाचा वाढता फैलाव अन्‌ विलगीकरणाच्या प्रक्रियेमुळे चाकरमान्यांनी गावाकडे पाठच फिरवली. गणरायाच्या आगमनापूर्वी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमधून 7 दिवसांत केवळ 638 चाकरमानीच गावी दाखल झाले. रेल्वे गाड्यांतून गाव गाठणाऱ्या चाकरमान्यांची संख्यादेखील मोजण्याइतपतच होती. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासात मात्र एस. टी. बसेसना पसंती दिली आहे. प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेऊन येथील एस. टी. प्रशासनानेही 91 जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. यातील 60 बसफेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले. 14 ग्रुप बुकिंग बसफेऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई, बोरिवली, ठाणे, नालासोपरा भांडूप, परेल, विठ्ठलवाडी मार्गावर जादा बसफेऱ्या धावणार आहेत. यापाठोपाठ येथील बसस्थानकातून आंतरजिल्ह्यात देखील बसफेऱ्या थावू लागल्या आहेत. पुणे, कोल्हापूर मार्गावर बसफेऱ्या धावत असून खेड - बोरिवली शिवशाही बसदेखील सुरू केली आहे. परतीच्या चाकरमान्यांचीही कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याकडे एस. टी. प्रशासन आतापासूनच नियोजनावर भर देत आहे. 

साडवली : कोरोना काळात कोकणात चाकरमानी कमी संख्येने आले असले तरी देवरुख एस. टी.आगाराने त्यांच्या परतीसाठी ग्रुप बुकिंगने जादा गाड्यांची सोय केली. गणपती विसर्जनादिवशी रात्री तीन जादा गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या. संगमेश्वर तालुक्‍यात देवरुख, संगमेश्वर साखरपा, माखजन येथुन चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्यांची देवरुख एस. टी, आगाराने सोय केली. मुंबई, बोरीवली, ठाणे, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी या जादा गाड्यांचे बुकींग झाले आहे. यामध्ये 27 तारखेला 3 गाड्या रवाना झाल्या. 28 तारखेला 24, 29 तारखेला 34, 30 तारखेला 38, 31 तारखेला 8 व नंतर 3 तारखेपर्यंत रोज 4 गाड्या सुटणार आहेत. अजुनही ग्रुप बुकिंग सुरु आहे. चाकरमान्यांचा यंदा कमी प्रतिसाद मिळाला असला तरी कोरोना काळात प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य एस. टी. ने जपले आहे व चाकरमान्यांना सेवा दिली आहे.