राबगावमध्ये नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न

अमित गवळे
गुरुवार, 10 मे 2018

पाली - ग्रामीण भागातील नेत्र रुग्णांच्या सोयीसाठी राबगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच एक दिवसीय नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न झाले. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट नेत्र रुग्नालय पाली, बी.डी.एल.आर व ग्राम सामिजिक परिवर्तन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामपंचायत राबगाव यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सुमारे ५० ते ६० लोकांच्या डोळ्यांची तपासणी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट नेत्र रुग्नालयातील डॉ. जयेश, डॉ. पूनम यांनी केली. या तपासणीत एकूण २१ लोकांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले. या मधील पिवळे रेशनकार्ड असणाऱ्या लोकांची बल्लाळेश्वर देवस्थान नेत्र रुग्णालय पाली येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असे शिबीर संयोजक दत्तात्रेय ठाकूर यांनी सागितले.

यावेळी शिबीर संयोजक दत्तात्रेय ठाकूर, ग्राम सामिजिक परिवर्तन मिशनच्या ग्रांमपरिवर्तक शिल्पा शिरवाडकर, आशा कार्यकर्ती स्मिता भोईर, गणेश भोईर, दिलीप मोरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. सदर शिबिरासाठी ग्रामस्थासह शाळा व्यवस्थापनाने चांगले सहकार्य केले.

Web Title: eye therapy camp at Rabagao