सावधान! बेशिस्तपणे कचरा फेकाल तर फेसबुकवर दिसाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! बेशिस्तपणे कचरा फेकाल तर फेसबुकवर दिसाल

सावधान! बेशिस्तपणे कचरा फेकाल तर फेसबुकवर दिसाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : बेशिस्त कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेने (ratnagiri corporation) शहरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) लावले; मात्र निर्ढावलेले काही शहरातील नागरिक सीसीटीव्हीचा वॉच धुडकावूनही ठिकठिकाणी बेशिस्तपणे कचरा टाकताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. कॅमेऱ्याची नजर असतानाही निर्ढावलेल्या नागरिकांकडून बिनधास्त कचरा टाकला जात आहे.

१२ कॅमेऱ्यांपैकी पटवर्धन हायस्कूल, झारणीरोड, कोकणनगर, मिरकरवाडा या भागातील काही बेशिस्त नागरिक, महिला कचरा टाकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोग्य सभापती, आरोग्य अधिकाऱ्यांकडे हे सीसीटीव्ही मोबाईलवर लाइव्ह दिसत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना आगावू सूचना दिली आहे. आता बेशिस्त नागरिकांचे हे फोटो पालिकेच्या फेसबुक पेजवर झळकवण्याचे आदेश आरोग्य सभापती निमेश नायर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा: 'पुढच्या 10 वर्षांत आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही'

रत्नागिरी पालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पालिकेला स्वच्छतेचा देशपातळीवरील पुरस्कार मिळाल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून रत्नागिरी शहराची ओळख राहावी, यासाठी वारंवार पालिकेकडून प्रयत्न केला जात आहे. शहर कचराकुंडीमुक्त केले आहे. प्रत्येक प्रभागात घंटागाडी सुरू करून घर आणि अपार्टमेंटपर्यंत जाऊन पालिकेचे कर्मचारी कचरा गोळा करत आहेत; मात्र शहरातील काही सुशिक्षित आणि बेशिस्त नागरिक स्वच्छ रत्नागिरीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पालिकेने यावर अनेक उपाय केले. कुंड्यांवर वॉचमन ठेवले, वृक्षारोपण केले, सुशोभीकरण केले. आता तर बेशिस्त नागरिकांनी हद्द केली. पालिकेने शहरातील १२ कुंड्यांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावले तरी कचरा टाकतच आहेत.

...ही आहेत १२ ठिकाणे

शहरातील मिरकरवाडा, पटवर्धन हायस्कूल, २ नं. शाळा, कोकण नगर, कोकण नगर स्मशानभूमीजवळील चारहात रस्ते, डंपिंग ग्राउंड, आठवडा बाजार (शाखेजवळ), वरचे मच्छीमार्केट, भाजीमार्केट (दोन), झारणीरोड, राजीवडा.

हेही वाचा: 'चिवला बीचवर मुख्यमंत्री राणेंचे घर पहायला आले होते का?'

loading image
go to top