'चिवला बीचवर मुख्यमंत्री राणेंचे घर पहायला आले होते का?' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'चिवला बीचवर मुख्यमंत्री राणेंचे घर पहायला आले होते का?'

'चिवला बीचवर मुख्यमंत्री राणेंचे घर पहायला आले होते का?'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कणकवली : सिंधुदुर्ग दौऱ्यावर (sindhurdurg district) आलेले मुख्यमंत्री (CM uddhav thackeray) कुठल्याही नुकसानग्रस्तांना भेटले नाहीत की एक रूपयाचे पॅकेज जाहीर केले नाही. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याने सिंधुदुर्गवासीयांची घोर निराशा झाली आहे. चिवला बीचवर राणेंच घर पहायला मुख्यमंत्री आले होते का? असाही टोला नितेश राणे (nitesh rane) यांनी लगावला. आज त्यांनी व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. (nitesh rane criticized on cm uddhav thackeray on konkan tour)

ते म्हणाले, 'सकाळी सातपासून निवती, वायरी गावातील नुकसानग्रस्त तसेच पोलिस यंत्रणा (police) मुख्यमंत्र्यांच्या येण्याची वाट बघत होती; पण ठाकरे केवळ चिवला बीचवर जाऊन माघारी फिरले. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचा हा लिपस्टिक दौरा असल्याचे आज स्पष्ट झाले. खरे तर त्यांनी सर्वाधिक नुकसान झालेल्या कणकवली, वैभववाडी तालुक्‍याची पाहणी करायला हवी होती.'

हेही वाचा: जनतेसाठी काहीतरी करुन दाखवा; आठवलेंची राज्यसरकावर टीका

राणे म्हणाले, 'पंतप्रधान मोदींन (PM modi gujrat tour) फक्‍त गुजरात दौरा केला. तेथील नुकसानग्रस्तांना एक हजार कोटींची मदत जाहीर केली असा आरोप विरोधक करत आहेत; मात्र ते आरोप निराधार आहेत. त्यांनी कोणतीही माहिती घेतलेली नाही. पंतप्रधानांनी नुकसानग्रस्त सर्वच राज्यांना मदत जाहीर केली आहे. त्याची आकडेवारी काही दिवसातच समोर येईल. त्यावेळी नुकसानग्रस्तांना राज्य सरकार मदत करतंय की केंद्र सरकार हे देखील चित्र स्पष्ट होईल.'

पुढे ते म्हणाले, 'निसर्ग चक्रीवादळाने सिंधुदुर्गात 8 कोटींचे नुकसान झाले. त्यापैकी फक्‍त 49 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. तशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलीय; पण जिल्हाधिकारी जर मुख्यमंत्र्यांना याबाबत वेगळी माहिती देत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांवर आम्हाला हक्‍कभंग आणावा लागणार आहे. जर निसर्ग चक्रीवादळ भरपाईपोटी 8 कोटी आले असतील तर तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात द्यावे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर सिंधुदुर्ग असा 700 किलोमीटरचा दौरा केला. वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व घटकांशी चर्चा केली. विधानसभेत आवाज उठवून नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही दिलीय. फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री जागे झाले आणि त्यांना सिंधुदुर्गात यावे लागले.'

मुख्यमंत्र्यांवर राणेंचे अजूनही प्रेम

चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागात जाण्याऐवजी मुख्यमंत्री चिवला बीचवर गेले. तेथे त्यांनी काय पाहिलं माहिती नाही; पण चिवला बीचवर राणेंचा बंगला आहे. चक्रीवादळात त्याचं काही नुकसान तर झालं नसेल ना? याची पाहणी कदाचित मुख्यमंत्र्यांनी केली असेल. कारणं त्यांचे राणेंवर अजूनही प्रेम आहे, असे राणे यावेळी म्हणाले.

हेही वाचा: 'माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले'

कणकवलीकर मतदारांचा अपमान

चक्रीवादळामुळे कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्‍यात सर्वाधिक नुकसान झालंय. त्यामुळे मुख्यमंत्री या तीन तालुक्‍यात येतील अशी अपेक्षा होती. आमच्या विरोधात शिवसेना उमेदवाराने चांगली लढत दिली. तब्बल 56 हजार मते शिवसेना उमेदवाराला मिळाली. असे असूनही मुख्यमंत्री या मतदारसंघात फिरकले नाहीत. हा कणकवली मतदार संघातील जनतेचा अपमान आहे असे श्री.राणे म्हणाले.

loading image
go to top