फेसबुकवर स्वातंत्रवीर सावरकरांची बदनामी व्यापा-याच्या अंगलट, पोलिसांकडून अटक

facebook.
facebook.

महाड - स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांच्या बद्दल सामाजिक भावना भडकावणारी पोस्ट व फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकणा-या महाड मधील एका व्यापा-याला महाड शहर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अटक केलेल्या या व्याप-याचे नाव राहूल प्रभाकर पाटेकर असे असुन ते चवदारतळे येथे राहतात. दोन सप्टेंबरला राहूल यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर स्वातंत्रवीर सावरकर यांनी आपले दोन्ही कान हाताने पकडले असल्याचे फोटो व वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली होती.यामुळे चवदार तळे परिसरात राहणा-या नागरिकांनी यावर आक्षेप घेतला. यामुळे काल रात्री चवदार तळे भागात तणावही निर्माण झाला होती. अखेर येथील बांधकाम व्यावसायिक शरद गांगल यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी राहूल पाटेकर विरोधात राष्ट्रपुरुषाचा अपमान करुन जनमानसात उद्रेक पसरविणारा व सार्वजनिक शांतता बिधडविण्यास कारणीभूत असल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाटेकर यांना अटक केली असुन, न्यायालयाने त्याना जामिनावर सोडले आहे. सोशल मिडीयावर लिहीताना आणि पोस्ट फॉरवर्ड करताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस कायम करत असतात परंतू त्याकडे लक्ष दिले जात नाही आणि मग पोलीस ठाण्याची हवा खाण्याची वेळ येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com