
False witchcraft allegations lead to brutal assault on family; ANiS helps register case against tantriks.
Sakal
-अमित गवळे
पाली: पेण तालुक्यातील गवळणवाडी गावात जादूटोण्याच्या नावाखाली एका निर्दोष कुटुंबावर गंभीर हल्ला करण्यात आला. तसेच मांत्रिकाने पूजेसाठी व गाव बांधणीसाठी मागितलेल्या बारा लाखांचा खर्च पीडित कुटुंबीयांनी न दिल्याने गावाकऱ्यांनी त्यांना जीवघेणी मारहाण केली. अखेर पीडित कुटुंबीयांनी पेण महा. अंनिसकडे धाव घेतली. शनिवारी (ता. 13) पेण महा. अंनिसच्या मदतीने दोन मांत्रिकांवर पेण पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.