esakal | संगमेश्वरात दीड दिवसांच्या गणरायांना निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

sangameshwar

संगमेश्वरात दीड दिवसांच्या गणरायांना निरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साडवली: कोरोनाचे नियम पाळत संगमेश्वर तालुक्यात गणेशोत्सवाला दहा तारखेला उत्साहात प्रारंभ झाला. मिरवणुक न काढता साधेपणाने घरोघरी गणरायांचे आगमन झाले. शुक्रवारी गणरायांची सेवा करून शनिवारी (ता. ११) दुपारनंतर दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. संगमेश्वर तालुक्यातील ८०० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा: चिपी विमानतळ उद्घाटनविषयी सुरेश प्रभूंचं मोठ वक्तव्य

संगमेश्वर तालुक्यात २५ हजार ७८६ घरगुती तर ८ सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन झाले. पावसाचा जोर असूनही भाविकांचा उत्साह दांडगा होता. शुक्रवारी गणोशोत्सवाला प्रारंभ झाला. दीड दिवसांच्या गणेशोत्सवातील ८०० गणेशमूर्तींचे शनिवारी विसर्जन झाले. या वेळी देवरूख नगरपंचायतीने नदीघाटावर आपत्कालीन यंत्रणा तत्पर ठेवली होती. देवरूख, संगमेश्वर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

एसटीने चाकरमान्यांच्या सेवेसाठी जादा बसेसचे नियोजन केले होते. बाजारपेठेतून खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेशभक्तांना पावसाचा व खड्डेमय रस्त्यांचा जादा त्रास झाला. यंदा कोरोनामुळे मिरवणूका काढणे व गर्दी यासाठी बंदी असल्याने ढोल, ताशांचा गजर ऐकू आला नाही. घरोघरी आरत्यांचे स्वर ऐकू येत आहेत.

loading image
go to top