रसायनी : शेतकऱ्यांची उन्हाळी भात कापणीची कामे सुरू

लक्ष्मण डूबे
बुधवार, 2 मे 2018

जांभिवली येथील शेतकऱ्यांनी येथील घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाच्या पाण्यावर तसेच पाताळगंगा नदीच्या काठावरील गावातील शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्यावर उन्हाळी भाताचे पिक घेतले आहे.

रसायनी (रायगड) : रसायनी पाताळगंगा परीसरातील शेतकऱ्यांची उन्हाळी भात कापणीची काम सुरू झाली आहे. तर बहुतेक शेतकऱ्यांनी भात कापणी पाठोपाठ झोडपणीची काम लगबगीने सुरू केली आहे. मोहोपाडा वगळता तर इतर ठिकाणी परीसरात भाताचे पिक चांगले आले आहे, असे सांगण्यात आले आहे. 

जांभिवली येथील शेतकऱ्यांनी येथील घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाच्या पाण्यावर तसेच पाताळगंगा नदीच्या काठावरील गावातील शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्यावर उन्हाळी भाताचे पिक घेतले आहे. तर मोहोपाडा येथील शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण केंदातुन सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर भाताचे पिक घेतले आहे. यंदाच्या वर्षी जया, रत्ना, सोना कोलम, आवनी आदि जातीचे पिक घेतले आहे असे सांगण्यात आले. 

वासांबे मोहोपाडा येथील शेतकऱ्यांच्या भाताच्या पिकावर करपा रोग पडल्याने शेतकऱ्यांचे पिक जळुन गेल्याने नुकसान झाले आहे. मात्र थोड फार वाचले असेल ते पदरात पाडण्यासाठी येथील आणि परीसरातील इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांची भात कापणीची काम सुरू झाली आहे. तर कापणी पाठोपाठ झोडपणीची कामही बहुतेक शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

Web Title: farmer work in rasayani