शेतकरी, मजूरांसोबत काँग्रेस ः घोरपडे

Farmers' Rights Day by Congress Party at Oros
Farmers' Rights Day by Congress Party at Oros

ओरोस (सिंधुदुर्ग) - 60 वर्षे कॉंग्रेस देशातील शेतकरी, मजूर, कामगार वर्ग यांच्या पाठीशी राहिला. आताचे मोदींचे सरकार हे अंबानी, अदानी यांचे आहे. त्यामुळे विविध तीन काळे कायदे त्यांनी केले आहेत. राज्य सरकारने याला विरोध केला आहे. पंजाबने वेगळे कायदे आणले, दिल्लीतही वेगळे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कॉंग्रेस आयोजित "किसान अधिकार दिन' कार्यक्रमात पक्षाचे जिल्हा प्रभारी वकील गुलाबराव घोरपडे यांनी केले. 

सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा येथे देशाच्या पोलादी महिला इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शेतकरी व कामगार कायद्याचा निषेध करण्यासाठी "किसान अधिकार दिन' कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हा प्रभारी घोरपडे, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, देवानंद लुडबे, महेश अंधारी, विजय प्रभू, महेंद्र सांगेलकर, उल्हास मणचेकर, दादामिया पाटणकर, प्रदीप मांजरेकर, सरदार काजल, कौस्तुभ गावडे, सिद्धार्थ परब, पल्लवी तारी, स्मिता टीळवे, अरविंद मोंडकर, रामचंद्र धनावडे आदी उपस्थित होते. 

"सत्याग्रह' तत्वानुसार आंदोलन 
गावडे म्हणाले, की वरिष्ठस्तरावरुन 40 पदाधिकारी घेवून आंदोलन करण्याचे आदेश होते. त्यामुळे कमी माणसे होती. भाजप सरकारने शेतकरी, मजूर विरोधी तीन बिले पास केली आहेत; मात्र या विरोधात कॉंग्रेस शेतकरी, मजूरांच्या पाठीशी उभी राहणार आहे. केंद्राने जाणून बुजुन हा कायदा आणला आहे. कॉंग्रेस हा कायदा रद्द करण्यास भाग पाडणार आहे. शेतकऱ्यांना महात्मा गांधी यांच्या "सत्याग्रह' या तत्वानुसार आंदोलन करून न्याय मिळवून देणार आहोत. जनतेने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com