पाली खोपोली मार्ग रुंदिकरण बाधीत शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

pali
pali

पाली - वाकण पाली खोपोली राज्य महामार्गच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. रुंदीकरणादरम्यान बाधीत शेतकर्‍यांना योग्य नुकसानभरपाई व मोबदला न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा ईशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सुधागड तालुका शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली पालीत नुकतीच शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली.

महामार्गालगत असलेल्या राबगाव, नाणोसे, हेदवली, दापोडे, भिलपाडा आदी गावांचे निवाडे नाहीत, सी.सी नाही, ताबे पावती नाही, सात बारा अंमल नाही, तसेच सदर जमीनीचा वापर केला आहे का? हे पहावे. या जमीनीचा वापर केला असेल तर नवीन भुसंपादनाच्या तरतुदीनुसार भुसंपादन करुन मोबदला द्यावा. तसेच आजवर बेकायदेशीररित्या जमीनीचा वापर केल्याबद्दल भुभाडे, नुकसानभरपाई व व्याज देण्याची मागणी यावेळी शेतकर्यांनी केली. मोर्चे, रॅली, रास्ता रोको, आमरण उपोषण आदी मार्गाने आंदोलने करुनही प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे सुधागड तालुका शेतकरी संघर्ष समन्वय समिती बाधीत शेतकरी जमीनीच्या मालकी हक्काबाबतचे उपलब्द कागदपत्र व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी दिली. रुंदीकरण बाधीत शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील मागणीच्या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात 1 नोव्हेंबर 2018 रोजी बाधीत शेतकरी, एम.एस.आर.डी.सी प्रशासन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी स्थानिक प्रशासनाला संयुक्त मोजणीचे आदेश दिले. मात्र आजतागायत समाधानकारक व योग्यपध्दतीने संयुक्त मोजणी होत नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. या बैठकीस प्रमोद मोरे, गिरिष काटकर, सचिन तेलंगे, नरेंद्र माळी, अविनाश देशमुख तसेच 19 गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

विकासाला आमचा विरोध नाही परंतू विकासाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या संसारावर नांगर फिरत असेल तर त्याला आमचा विरोध आहे व राहिल. जोपर्यंत रुंदीकरण बाधीत शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरुच राहिल.
- प्रमोद मोरे, अध्यक्ष सुधागड तालुका शेतकरी संघर्ष समन्वय समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com