मंडणगड : भूसंपादनाबाबत बाधित शेतकरी करणार निषेध

६ डिसेंबरला राष्ट्रपतींचा दौरा; न्याय मागणार
भूसंपादन
भूसंपादनsakal

मंडणगड : मंडणगड तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी. डी. या महामार्गात बाधित होणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर जमीन अधिग्रहणाच्या मुद्यांवर भूमिग्रहण अधिकारी तथा प्रातांधिकारी दापोली यांच्याकडून अन्याय होत आहे. या अन्यायाचा काळ्या फिती लावून शेतकरी निषेध व्यक्त करणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना २९ नोव्हेंबरला देण्यात आले.

मंडणगड तालुका शेतकरी संघटना अंर्तगत राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती म्हाप्रळ ते पाचरळ यांच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपती हे ६ डिसेंबर २०२१ ला आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देणार आहेत. आंबडवे गावाशी संबंधित असणारा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने स्थानिक प्रशासनाकडून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निषेध व्य़क्त करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. बाधित शेतकरी गत दोन वर्षांपासून सनदशीर मार्गाने स्थानिक प्रशासनाकडे दाद मिळवण्यासाठी मागणी करीत आहेत.

भूसंपादन
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

भूलथापा व बळजबरीने...

प्रशासन हे दडपशाही, भूलथापा व बळजबरीने कार्यवाही पूर्ण करण्याचा मार्ग अवलंबत आहे. राष्ट्रीय महामार्ग भूमी अधिग्रहण अधिकारी तथा प्रातांधिकारी दापोली हे वेगवेगळ्या युक्त्या-प्रयुक्त्या काढून कागदपत्र, त्यांच्याकडे उपलब्ध नसलेले अभिलेख आपल्याकडे उपलब्ध असल्याचे उच्च न्यायालय मुंबई येथे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

१ हजार जण काळ्या फिती लावणार

तालुक्यातील ११ गावांतील २९७ शेतकरी व त्यांचे कुटुंबीय असे सुमारे १ हजार स्थानिक लोक स्थानिक प्रशासनाविरोधात काळ्या फिती लावून निषेध करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना या संदर्भात निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, म्हणून विनंती करणार असल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख रमेश घडवले, कौस्तुभ जोशी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com