

What Happened That Night? Father-Son Dead, Wife Battles for Life in Mapusa
sakal
सावंतवाडी : शहराजवळील सोनुर्ली-जाधववाडी येथील जाधव कुटुंबातील बाप-लेकाचा मृतदेह म्हापसा-करासवाडा येथील बंद खोलीत आज सापडला. त्या शेजारीच पत्नी अत्यवस्थ स्थितीत आढळली. ही सामूहिक आत्महत्या की घातपात, याबाबत संभ्रम आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. अजय देऊ जाधव (वय ३८) आणि त्यांचा मुलगा अथर्व (७) अशी मृतांची नावे असून, पत्नी सुवर्णा (३०) यांची प्रकृती चिंताजनक आहे.