esakal | त्याला जायच होत वडिलांच्या उपचारासाठी पण......

बोलून बातमी शोधा

father treatment but son not reach kokan marathi news

विश्र्वास मुंबईतून निघाला. प्रत्येक चेकपोस्ट झालेली घटना आणि पुराव्यासाठी व्हॉटसॲपवरील कागदपत्रे दाखविली. मात्र..

त्याला जायच होत वडिलांच्या उपचारासाठी पण......
sakal_logo
By
मयूरेश पाटणकर

गुहागर (रत्नागिरी) : यंत्रणेच्या निष्ठूर आणि बेअकली कारभाराचा फटका तालुक्यातील परचुरी गावाच्या तरुणाला बसला. वडीलांवर उपचारासाठी सोडले नाहीत आता अंत्यसंस्कारसाठी तरी सोडा अशी विनंती करण्याची दुर्दैवी वेळ या तरुणावर आली. तारतम्य बाळगून यंत्रणेने दडपशाही केली नसती तर परचुरीतील रावजी सोलकर या पित्याची भेट पुत्र विश्र्वास सोलकरशी झाली असती.  ही घटना काल वडखळनाका येथे घडली.

रावजी सोलकर (वय 75) एकटे रहात होते. गुरुवारी (ता. 26) त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. ग्रामस्थांनी ग्रामकृतीदलाच्या मदतीने रावजी सोलकर यांना चिपळूणातील खासगी रुग्णालयात हलविले. नोकरीनिमित्त मुंबई रहाणाऱ्या त्यांच्या मुलाला विश्र्वास रावजी सोलकरला वडील आजारी असल्याचे कळविण्यात आले. देशात संचारबंदी असल्याने त्याला महामार्गावर अडविले जावू नये म्हणून खासगी रुग्णालयाचा दाखला, केसपेपर, उपचाराची कागदपत्रे व्हॉटस्ॲप करण्यात आली.

हेही वाचा- अजूनही होम क्वारंटाईन फिरताहेत बिनधास्त.....

विश्र्वास मुंबईतून निघाला. प्रत्येक चेकपोस्ट झालेली घटना आणि पुराव्यासाठी व्हॉटसॲपवरील कागदपत्रे दाखविली. त्यामुळे मुंबई पोलीस, नवी मुंबई पोलीसांनी त्यांला सोडले. पण वडखळनाका येथे पोलीसमित्र आणि गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अडकविले. कोणतीही चौकशी न करता दडपशाही केली. मारण्याची धमकी दिली. त्यामुळे विश्र्वास पुन्हा बोरीवलीला परतला. 

 हेही वाचा-धक्कादायक ! सांगलीतील आणखी 12 जणांना कोरोना

 उपचारासाठी अडविले, अंत्यसंस्कारासाठी सोडले

मुलगा रुग्णालयापर्यंत पोचू शकला नाही. वडील कोमात गेले. अशावेळी खर्चिक उपचारांसाठी निर्णय कोणी घ्यायचा. रुग्णालय रावजी सोलकरना एकट्याला ठेवून द्यायला तयार नव्हते. कोरोनाच्या भितीने रुग्णालयात थांबायला ग्रामस्थ तयार नव्हते. अखेर कोमात गेलेल्या रावजी सोलकर यांना रुग्णालयातून परचुरीला आणण्याचा निर्णय झाला. दुर्दैवाने उपचार होवू न शकल्याने रावजी सोलकरांचा गुरुवारी रात्री 3.30 वा.  मृत्यू झाला. मुलगा विश्र्वासला याची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतीने पुन्हा वडीलांचा मृत्यु झाल्याने मुलाला अंत्यसंस्कार करण्यासाठी गावी येण्याची परवानगी द्यावी असे पत्र पाठविले. हे पत्र दाखवून बोरीवली ते गुहागर असा प्रवास विश्र्वास सोलकर यांनी विना अडथळा केला.

 हेही वाचा- अजूनही होम क्वारंटाईन फिरताहेत बिनधास्त.....

हतबल झालो आहोत

महामार्गावरील यंत्रणेमुळे मुलगा वडिलांच्या उपचारासाठी रुग्णालयापर्यंत पोचू शकला नाही. मात्र तिच यंत्रणा वडीलाच्या अंत्यसंस्कारांसाठी मुलाला पाठवते. इतकी निष्ठूरपणे यंत्रणा वागत असल्याने हतबल झालो आहोत. 
सत्यवान दर्देकर, सरपंच, परचुरी